पंढरपूर LIVE 21 डिसेंबर 2018
नवीन लादलेला सायबर कायदा हा आणीबाणीचाच एक प्रकार असून यावरुन केंद्रातील भाजप हे जनतेच्या खासगी आयुष्यात डोकावत आहे हे सिद्ध होते. याचाच अर्थ हे पुन्हा EVM मशिनमध्येही घुसून २०१९ मध्ये हवा तो निकाल लावण्याच्या तयारीत आहे का असा सनसनाटी आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. केंद्र सरकारने सायबर सुरक्षेसाठी केलेला नवीन कायदा व यासाठी नेमलेल्या संस्था याबाबतचा विषय देशात ऐरणीवर आला आहे. याविषयी खा.राऊत बोलत होते. यावेळी खासदार अनिल देसाई, खा. विनायक राऊत, खा. अरविंद सावंत उपस्थित होते.
‘जनतेच्या खाजगी आयुष्यात घुसखोरी करुन निर्माण केलेला दहशतवाद असून जर तुम्ही मोबाईल , कंप्यूटर मध्ये घुसत आहात याचा अर्थ तुम्ही EVM मशीनमध्येही घुसला आहेत का?’ अशी शंका खा. राऊत यांनी व्यक्त केली. तीन राज्यातील पराभवानंतरही तुम्ही पुढची लोकसभा निवडणुक जिंकण्याची भाषा करीत आहात याचाच अर्थ आगामी काळातही भाजप मतदान यंत्रणेत घोळ घालते का असा आरोप खा. राऊत यांनी केला. भाजपाची पावले या दिशेने जात आहेत यावरुन आगामी काळात महाराष्ट्र व देशात या पक्षाला जनता पराभूतच करेल नव्हे तर जमालगोटा देईल असे राऊत म्हणाले आज हनुमानाच्या जात आणि धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यांना कोण मुसलमान तर कोणी थेट चायना माल म्हणतय, नवीन विकृत रामायण तयार करण्याचे काम सुरु केले असून आमच्या दैवतावरील अपमान आम्ही सहन करणार नसल्याचेही त्यांना म्हटले. तसेच हिंदुत्वाचा सर्वात जास्त अपमान हा भाजपाने केल्याचे त्यांनी सांगितले.
एनडीए ही भाजपाची मालमत्ता नसून त्याच्या सातबारावर शिवसेना व अकली दलाचा सारखाच अधिकार असल्याचे सांगत एनडीए सोडून जावा म्हणणाऱ्यांचे खा.राऊत यांनी कान टोचले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकासाठी भाजप सोबतच्या युती बाबत पसरविल्या जात असलेल्या बातम्या या खोट्या आहेत यापुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल असे खा.राऊत यांनी ठासून सांगितले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com