👁 9 Views

आई-वडिलांच्या प्रेमाचा तळ समजणं खूप कठीण असते : मा. श्री. समाधान (दादा) आवताडे

पंढरपूर LIVE 3 जानेवारी 2019

सामान्य कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा एखाद्या इंद्रधनुष्याप्रमाणे उद्धवराव लटके आणि विजयाताई व इंद्रधनुष्यातील सात रंगाप्रमाणे त्यांची सात मुलं आहेत. मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. कष्टातून समृद्धीकडे अशी लटके परिवाराची वाटचाल आहे. खरं तर आई-वडिलांच्या प्रेमाचा तळ समजणे खूप कठीण असते. असे प्रतिपादन श्री. संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. समाधान (दादा) आवताडे यांनी केले. बालाजीनगर पंढरपूर येथील श्री. उद्धवराव भिमराव लटके (पेढेवाले) यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते वेळेनुसार सर्व कामे चालक-मालक युक्तीप्रमाणे करणारे लटके पेढेवाले यशस्वी वाटचाल करीत आहेत. उद्धवराव आण्णा यांना दादांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी व उज्वल कारकिर्दीसाठी उत्तुंग अशा शुभेच्छा दिल्या.
  
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विनोदराज लटके म्हणाले की आई-वडिल आमचे थोर त्यांचे काय सांगू उपकार त्यांच्या उपकाराची मी व माझी सहा भावंडं कधीही विसरणार नाही आणि त्यांची सर्व स्वप्ने निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.
 सदर कार्यक्रमात मा. श्री. रामचंद्र गंगाखेडकरअभयसिंह कुलकर्णीनारायण निंबाळकर धनंजय पवारबाळासाहेब झरकर,बलभीम रणदिवे व  मिलिंद बडवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प विनय महाराज बडवे व एस. एम. आवताडे कंपनी प्रा.लि. संचालक संजय (मालक) आवताडे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी तसेच संचालक सचिन शिवशरण जि. प. सदस्य सोलापूरचे नितीन (मालक) नकाते व युवानेते विनायक यादवसाहेब, शेखरभाऊ भोसले, हनुमंत शेळकेसाहेब, तात्या मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यासाठी दै. पंढरी संचार चे संपादक बाळासाहेब बडवे व मदन महाराज हरिदास आवर्जून उपस्थित होते.
        सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लटके परिवारावर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार उपस्थित होते तसेच समाजसेवक संतोष कवडे,नगरसेवक प्रशांत शिंदेअविनाश मोरेबालम मुलाणीभारत निकम,सज्जन अवताडेलियाकत मुलाणी तसेच समाधान आवताडे युवामंच मधील सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा तळेकर यांनी केले तर आभार प्रशांत (मुन्ना) मलपे यांनी  मानले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *