👁 9 Views

आदिवासी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त सामुदायिक विवाह उत्साहात संपन्न

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2019


सालाबादप्रमाणे यंदाही महर्षी वाल्मिकी संघाच्यावतीने आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन दि  ०२/०१/२०१९ रोजी सायंकाळी ७:२४ वाजता आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व्यायाम शाळेच्या पाठीमागे वाल्मिकी भवन येथे संपन्न झाला.

भारतीय समाज जीवनामध्ये विवाह हा अत्यंत पवित्र असा संस्कार मानला जातो, परंतु सध्या विवाह म्हणजे जीवघेणा हुंडा, मानपान व पैशाची उधळपट्टी होत असते परंतु सध्या सोलापूर जिल्हा हा दुष्काळाने ग्रासलेला आहे. या परिस्थितीमध्ये मुला मुलींचे लग्न करणे है आईवडिलांना आर्थिकदृष्ट्या खूप कठीण होत आहे हि समाजाची गरज ओळखून, महर्षी वाल्मिकी संघ यांच्या मार्फत सामुदायिक विवाह सोहळा हि संकल्पना राबवित आहेत. या विवाहामध्ये हुंडा देणे घेणे , अनावश्यक खर्च या गोष्टींना फाटा देऊन ०८ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सामुदायिकरीत्या पार पाडण्यात आला.
महर्षी वाल्मिकी संघातर्फे विवाहाच्यावेळी वधूस शालू. हळदीची साडी, मणीमंगळसूत्र, जोडवे, बिचव्या , मुंडावळ्या, हारतुरे, देण्यात आले व भोजन तसेच नवदापंत्यासाठी संसार उपयोगी भांडी देण्यात आली व वधूवरांचे भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली.
अशी माहिती संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली. या विवाह सोहळ्यात प्रमुख पाव्हणे म्हणून माजी आमदार मा. सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत(नाना) भालके, समाधान (दादा) अवताडे, प्रकाश (तात्या) पाटील, शैलाताई गोडसे,  साईनाथभाऊ अभंगराव, धनंजय कोताळकर, लक्ष्मण शिरसाट, अरुण (भाऊ) कोळी, शरद कोळी, नागेश आंबेकर, मारुती संगीतराव, बाळासाहेब बळवंतराव, विक्रम शिरसट, दत्ता कांबळे, सिद्धनाथ कोरे,सुरेश नेहतराव, डिराज सर्वगोड, किरण घाडगे, शिवाप्पा कोळी सर्व संघटनाचे पदाधिकारी, व कार्यकर्ते व जेष्ठ यांच्यासह आदी उपस्थित होते.
       
हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी जयवंत (आण्णा) अभंगराव, निलेश माने ,हणमंत कोरे, संपत सर्जे, राहुल परचंडे, वैभव कांबळे, विकी अभंगराव, सुरज कांबळे, संतोष संगीतराव, संजय पगारे, अर्जुन देवकुळे, बालाजी कोळी, हनुमंत कांबळे, सुधाम होमकोबडे, महेश कांबळे, प्रकाश मगर, विकी संगीतराव, पांडुरंग कोळी, दावल शेख, श्रीकांत बळवतकर,  ह्यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले
या वेळी समाजातील सर्व जातिधर्माचे समाजबांधव  व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *