👁 6 Views

तुमच्याकडे अद्यावत ज्ञान असेल तर तुम्हाला नोकरी मिळणारच -डॉ. बाहुबली कंदळे

पंढरपूर LIVE 9 जानेवारी 2019

पंढरपूर (प्रमोद बनसोडेअभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन चांगली नोकरी मिळवायची असेल तरतुमच्याकडे  उत्तम कौशल्य, उत्तम ज्ञान असणे गरजेचं आहे. उत्तम ज्ञान आत्मसात करून चांगलीनोकरी मिळवणे आज खूप अवघड झाले आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात नवनवीन टेक्नॉलॉजी शिकणे आज विद्यार्थ्यांनी महत्वाचे असून जर विद्यार्थी बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार नवीन ज्ञान आत्मसात करू शकला तरच येणारी नवीन टेक्नॉलॉजी त्यांना शिकता येईल. 

तुमच्याकडे अद्यावत ज्ञान किती आहे याचा विचार कंपनी करते. अलीकडच्या काळातील टेक्नॉलॉजीच्या कंपन्या खूप आहेत अशा वेळी नोकरीसाठी त्या कंपन्या तुमच्याकडे अद्यावत ज्ञान किती आहे याची पडताळणी करून तुम्हाला कंपनीत नोकरीदिली जाते. यावेळी तुमचे शैक्षणिक गुण पहिले जातात. तुम्ही फस्ट क्लास अनेक पास असणे खूप महत्त्वाचे आहे. जे विद्यार्थी फस्ट क्लास असेल अशा विद्यार्थ्यांना कंपनीत चांगल्या प्रकारे नोकरी मिळू शकते. तुमच्याकडे अचूक ज्ञान असेल तर त्याचा फायदा कंपनीला कितपत होईल याचा विचार करून कंपनी करते आणि तुम्हाला नोकरी देते. अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच बाहेरचे ज्ञान हे तुम्हाला असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला इतर ज्ञान आहे का?  याचा  विचार कंपनी करते आणि तुम्हाला नोकरी देते. असे मत डॉ. बाहुबली कंदळे यांनी पंढरपूर सिंहगड मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
   

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली "मायक्रोस्फॉट टेक्नोलॉजी सर्टिफिकेट प्रोग्रॅम" या विषयावर डॉ. बाहुबली कंदळे यांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. बाहुबली कंदळे यांचा कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरींग विभाग प्रमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हे गेस्ट लेक्चर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरींग विभागातील चतुर्थ वर्षात अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा. सोमनाथ ठिगळे यांनी केले.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *