पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2019
स्वेरीत डासांपासून होणारे रोग व त्यावरील उपचार याविषयी जनजागृती मोहीम संपन्न
पंढरपूर-(संतोष हलकुडे)‘आपल्या आजूबाजूला, परिसरात साचलेले पाणी, वाळलेले व ओली लाकडे, प्लास्टिक वस्तु यामध्ये पावसाचे अथवा सांडपाणी साचून राहते. त्यामुळे त्याठिकाणी डास अंडी घालतात. त्यामुळे अल्पावधीत डासांची उत्पत्ती होते आणि आजार पसरवतात. डासांचे विविध प्रकार असून काही डास रात्री चावतात तर काही डास दिवसा चावतात. डासांमुळे अनेक गंभीर आजार जडले जातात. यासाठी आजार होण्यापुर्वीच काळजी घ्यावी. सांडपाणी, केरकचरा साचू न देता याची योग्य विल्हेवाट लावावी. घर व परिसर सतत स्वच्छ ठेवावे. डासांमुळे चिकन गुनिया, फायलेरीया (हत्ती रोग), मलेरिया, डेंग्यू असे अनेक रोग होवू शकतात. रोगानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होऊ नये यासाठी उपचारापूर्वीच काळजी घ्यावी.’ असे प्रतिपादन विभागीय कीटक शास्त्रज्ञ डॉ. एम.एम. देशपांडे यांनी व्यक्त केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक आरोग्यसेवा पुणे यांच्यातर्फे स्वेरी संचलित फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण’ या विषयावर आयोजिलेल्या कार्यक्रमात हिवताप निर्मुलन अधिकारी व त्यांची समिती जनजागृती करण्यासाठी स्वेरीमध्ये आली होती. यामध्ये विभागीय किटक शास्त्रज्ञ डॉ. एम.एम. देशपांडे मार्गदर्शन करत होते. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी प्रस्तावनेत ‘डंक छोटा, धोका मोठा’ या जागतिक संदेशाच्या पार्श्वभूमीवर किटकजन्य आजार व त्यापासून होणारे रोग आणि घ्यावयाची काळजी याबाबत माहीती दिली. डास व डासांप्रमाणे असणाऱ्या किटकांपासून जापनीज एनसेफालितीस, चिकन गुनिया, फायलेरीया (हत्ती रोग), मलेरिया, डेंग्यू यासारखे होणारे आजार व त्याची घ्यावयाची काळजी याविषयी महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी डासांपासून होणारे रोग व उपचार याविषयी विविध प्रश्न विचारले असता हिवताप निर्मुलन अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

विविध प्रकारचे डास, त्याचे अंडी, डासांची उत्पत्ती कशी होते ? व डासांविषयी विस्तृत माहितीच्या प्रदर्शनाच लाभ विद्यार्थ्यांनी घेतला. शेवटी विद्यार्थ्यांकडून डास निर्मुलन प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा हिवताप सहायक अधिकारी विजय बागल यांनी परिश्रम घेतले. यावेळी जिल्हापरिषद सोलापूरचे साथ रोग अधिकारी डॉ. मदन देशपांडे, आरोग्य सहायक संतोष कुलकर्णी,दत्तात्रय पापळ, पी.बी. वाडेकर, एस.डी.देशमुख,किरण मंजुळे, संजय म्हेत्रे आदी आरोग्य कर्मचारी व पर्यवेक्षक यांच्यासह फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल, प्राध्यापक वर्ग व बी. फार्मची व डी. फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. आर माने यांनी केले तर अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com