👁 13 Views

स्वेरीत गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण संपन्न…. अध्यापक संघाचे कार्य उत्तम-आमदार दत्तात्रय सावंत

पंढरपूर LIVE 2 फेब्रुवारी 2019

                              
पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांची दखल घेतली जावून त्यांचा उचित सन्मान करत असताना त्यांच्या कार्याची ‘गुणवंत शिक्षक’ नामक पुरुस्काराच्या रूपाने पोच पावती दिली जाते. शिक्षक तळमळीने शिकवून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करतो. याची दखल घेतली जावी या उद्देशाने पंढरपूर तालुका मराठी अध्यापक संघ पंढरपुरच्या वतीने ‘गुणवंत शिक्षक’ म्हणून गौरव केला जातो ही बाब महत्वाची असून या पुरस्काराने आणखी प्ररणा मिळते. शिक्षकांना प्रेरणा देण्याचे हे अध्यापक संघाचे कार्य उत्तम आहे.’ असे प्रतिपादन विधान परिषदेचे सदस्य तथा शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केले.               
पंढरपूर तालुका मराठी अध्यापक संघ, पंढरपूर यांच्यावतीने गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजिलेल्या ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ वितरणाच्या कार्यक्रमात शिक्षक आमदार सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे होते. प्रास्तविकात सोलापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सचिव राजेंद्र आसबे यांनी गुणवंत शिक्षक पुरुस्काराचे स्वरूप, पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती आणि अध्यापक संघटनेची वाटचाल याविषयी सविस्तर माहिती दिली.

नांदोरे (ता.पंढरपूर) माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक अनिल भिंगारे, वाकी (ता. सांगोला) विद्यामंदीर हायस्कूलचे रेवण औताडे, रड्डे (ता. मंगळवेढा) मधील लक्ष्मीदेवी विद्यामंदीरचे सहशिक्षक नानासाहेब कटारे, निमगाव (ता. माळशिरस) विद्यामंदीरचे सहशिक्षक मधुकर शिंगटे, पुळूज (ता. पंढरपूर) मधील लिंगेश्वर विद्यामंदिरच्या सहशिक्षिका सौ.सारिका सूर्यवंशी तर मंगळवेवेढ्यामधील इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सौ. विजया घाडगे अशा एकूण सहा शिक्षकांना ‘गुणवंत शिक्षक’ म्हणून आमदार सावंत आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे म्हणाले की, ‘भूतकाळात केलेल्या कामाचे फळ हे भविष्यात बळ ठरते. खरे तर मराठी भाषा ही इंग्रजीभाषेपेक्षा अवघड असून बोलण्यापलीकडची आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती रुजविण्याचे कार्य शिक्षकांकडून होत आहे. विद्यार्थी दशेत हिताचे कोणते काम आहे हे विद्यार्थ्यांना समजत नसते आणि शिक्षक तळमळीने शिक्षण देवून सुसंस्कृत विद्यार्थी कसा घडेल? यासाठी परिश्रम घेतात याचेच फळ म्हणून ‘गुणवंत शिक्षक’ म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. ही पोचपावती जोमाने कार्य करण्यासाठी आणखी उर्जा देते.’ असे सांगून शिक्षणाने संस्कारीत झालेल्या अनेकांची उदाहरणे दिली.

यावेळी प्राचार्य तुकाराम मस्के, तावशीतील साधना विद्यालयाचे प्राचार्य प्रा. तानाजी अनुसे, चळेमधील दर्लिंग विद्यामंदीरचे प्राचार्य लक्ष्मण मोरे, पुळूजमधील लिंगेश्वर प्रशालेचे मुख्याध्यापक सौ. प्रिया यादव, समाधान दुधाट, अध्यापक संघाचे अध्यक्ष रवींद्र मोरे, सचिव विजयचंद्र पाटील यांच्यासह संचालक व पदाधिकारी, गुणवंत शिक्षकांच्या परिवारातील सदस्य व स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग हजारे यांनी केले तर बसप्पा पुजारी यांनी आभार मानले. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *