पंढरपूर LIVE 5 फेब्रुवारी 2019
गोवा येथे पार पडलेल्या नॅशनल स्केटिंग कॉम्पिटिशन मध्ये पंढरपुरातील 3 स्पर्धकांनी फर्स्ट रँक ची पदके मिळवली तर या स्पर्धेत एकूण 18 जणांनी विविध रॅंकची पदके संपादन करून या स्पर्धेवर पंढरपुरचा झेंडा रोवला . या स्पर्धेतून , पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी तब्बल सहा लाख 50 हजार रुपयांची स्पॉन्सरशिप मिळविली आहे.
‘फास्टेस्ट रेस’ कॅटेगरीमध्ये मयुरी आसबे आणि कौस्तुभ भोसले यांना फर्स्ट रॅंक व स्पॉन्सरशिप तसेच ‘टाईम ट्रायल’ या कॅटेगरीत कु. अभा अनिरुद्ध बडवे हिला फर्स्ट रँक मिळाला.
स्केटिंग सारख्या खेळासाठी पंढरपुरात फारशा मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही तब्बल अठरा खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले . गोवा नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये विविध राज्यातून आलेल्या सुमारे चारशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला . यामध्ये पंढरपूरच्या आरएक्स ऍकॅडमीच्या 22 खेळाडूंनी सहभाग घेतला , त्यापैकी 18 जणांना पदके प्राप्त झाली.
यशराज कल्याणराव काळे , हर्ष गांधी , अमोल तेली यांना यांना फोर्थ रॅंक तर अर्जुन जाधव , सुरेश भोसले यला फिफ्त रॅंक चे मेडल प्राप्त झाले . टाईम ट्रायलमध्ये रोहित चौगुले , अर्जव फडे , निरंजन पुजारी , श्रीनिवास संघनवार , अश्विनी श्रीवास्तव , मुकद्दरसिंग , संस्कार भालेराव , आदित्य शिवशरण यांना अनुक्रमे चार ते पाच रॅंकची पदके व तीस हजार रुपयांची आंतरराष्ट्रीय स्पॉन्सरशिप मिळाली.
या स्पर्धेचा फर्स्ट रँक साठी एक लाख रुपयांचे तर सेकंड रसाठी 70 हजार रुपयांची स्पॉन्सरशिप आहे . तीन ते पाच साठी 50000 तर पाच यापुढील रॅंक मध्ये यश संपादन करणाऱ्यांना 30 हजार रुपयांची स्पॅान्सरशीप मिळालेली आहे .पंढरपुर च्या विद्यार्थ्यांनी एकूण सहा लाख 50 हजार रुपयांची स्पॉन्सरशिप मिळवली .यामध्ये अरिहंत पब्लिक स्कूल, एम आय टी आणि सिंहगड या प्रशालेचे विद्यार्थी , खेळाडु आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






