👁 12 Views

शेतकऱ्यांच्या लेकींचा दुर्गावतार; एकीची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019                   

           

 पुणतांबा(अहमदनगर): सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ पुणतांबा येथील तीन कृषीकन्या उपोषणाला बसल्या आहेत. यातील शुभांगी जाधव या मुलीची तब्येत खालावली आहे. त्यामुळे रात्री उशिरा १ वाजल्याचा सुमारास तिला नगर इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.            

या आंदोलनात निकिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या ३ शेतकऱ्यांच्या मुली सहभागी झाल्या होत्या. गेल्या ५ दिवसांपासून त्यांचे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु, आज ५ दिवस होऊनही सरकारमधील कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यांच्या मागण्य़ांवर कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्याने मुली आंदोलनावर अजूनही ठाम आहेत. तर आज पालकमंत्री राम शिंदे उपोषणस्थळी मुलींची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 
तर या मुलींच्या मदतीला पुणतांब्यात आज सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सरकार यांच्या मागण्य़ांकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *