👁 9 Views

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या गुणांनी वेगळी ओळख तयार केली पाहिजे -डॉ. शेरॉन भोपटकर

पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019                          


* पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये यशस्वी विद्यार्थी सन्मान व पालक मेळावा
        पंढरपूर (प्रमोद बनसोडे-माळी) मुलांचे वय वाढत असताना शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन त्यांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम लक्षात घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे पालकांनी व मुलांनी एकमेकांना समजून घेण गरज आहे शिवाय दोघांमध्ये संवाद होणे ही खूप महत्वाचा आहे वय वाढत असताना ज्या काही समस्या निर्माण होतात अशा समस्या वर संवाद झाला पाहिजे. शैक्षणिक वयात अधिक ताण तणाव असतात. घरच्या समस्या आणि सध्या मोबाईलवर इंटरनेटचा अतिरिक्त वापर आणि वाढती व्यसनाधीनता यामुळे आजचा युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या गुणांनी वेगळी ओळख तयार केली पाहिजे से मत डॉ. शेरॉन भोपटकर यांनी एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर मध्ये बोलताना व्यक्त केले.                   
यावेळी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडेप्रा. अनिल निकमप्रमुख पाहुणे डॉ. शेरॉन भोपटकरपालक प्रतिनिधी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व  दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मुलांचे मानसिक आरोग्य व पालक-पाल्य संवाद या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षेत उत्कृष्ट व उज्वल यश संपादन केलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेत असलेल्या यशस्वीविद्यार्थ्यांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना म्हणाल्या.

यावेळी पुढे बोलताना डॉ. शेरॉन भोपटकर म्हणाल्या, तुम्ही कसे  दिसता यापेक्षा तुम्ही काय आहात हे समोरच्याला दाखवून द्या. प्रत्येक माणसामध्ये काही ना चांगला गुण असतोच. तुमच्या मधले वेगळेपण शोधून स्वतःची वेगळी ओळख तयार करा. सकरात्मक लोकांच्या सहवासात नेहमी राहा. मुलांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव आणि  त्यांच्या गरजा मुलांना विश्वासात घेऊन समजून सांगा. आयुष्यात आपली मर्यादा ओळखा अभ्यासाचे नियोजन करून तणावमुक्त जीवन जगा. सध्याच्या जीवनात मोबाईलचा होत असलेला अतिरिक्त वापर टाळणे आज काळाची गरज असल्याचे मत डॉ. शेरॉन भोपटकर व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता पांडे व ऋतुपर्ण लावंड तर उपस्थितांचे आभाररोहन देशमुख व ज्योत्स्ना राऊत यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *