👁 11 Views

दयावान ग्रुप आंबे यांच्या वतीने छ. शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

Pandharpur LIVE 22 February 2019

दयावान ग्रुप आंबे यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दयावान ग्रुप च्या  कार्यकर्त्याकडून   व माता भगिनींच्या    हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच  हुशार विद्यार्थ्याचा सन्मान करण्यात आला.

दयावान ग्रुपच्या माजी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा सन्मान करनायत आला.  याप्रसंगी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून, दहशतवाद्यांचा (पाकिस्तानचा) जाहीर निषेध करण्यात आला. यानंतर माता, भगिनींसह, पुरुषांना,लहान शिवभक्तांना डोक्याला मानाचा भगवा फेटा बांधुन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 




या प्रसंगी ग्राम. पंचायत सदस्य अरुण (मामा )शिंदे याच्या शुभहस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच मा. उप सरपंच विठ्ठल शिंदे, अन्सार शेख, हिरालाल शेख, पांडुरंग शिंदे, चंद्रकांत गायकवाड,  शिवाजी भोसले, संभाजी शिंदे,महादेव शिंदे, संतोष कोळी, लक्ष्मण शिंदे, समाधान शिरगुर, किरण बनसोडे, गणेश साळुंखे, सागर साळुंखे, सुजीत शिंदे, तसेच जि.प शाळा आंबे येथील सर्व शिक्षक वृंद व  दयावान ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी शिवजन्मोत्सव निम्मीत खलील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
 शैक्षणिक साहित्य वाटप :- शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 
विविध स्पर्धा :- रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, खाऊ वाटप इत्यादी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांना देशभक्ती,आरोग्य इत्यादी विषयावरती माहिती हि देण्यात आली. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवजन्मोत्सव सोहळा समितीमधील सर्व कार्यकर्ते तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले. यावेळी सूत्रसंचालन श्री माने गुरुजी यांनी केले तर आभार श्री नामदे  गुरुजी  यांनी मानले.

विशेष बाबा म्हणजे या मंडळाने पुढील वर्षी होणाऱ्या शिवजयंतीच्या निम्मिताने या शाळेतील मुलाच्या अंगी असलेल्या उपजत कला गुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलसाठी कलमांचा , लाईट डेकोरेशन, साऊंड सिस्टीम  उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. शाळेच्या वतीने त्यांचे आभारही मानण्यात आले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *