Pandharpur LIVE 28 February 2019
मराठी संस्कृती ही मानवतावादी संस्कृती आहे. म्हणून संत आणि कवींनी जगाच्या कल्याणाचा मानवतावादी विचार मराठी कवितेतून मांडला आहे. ही परंपरा कवी कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून मांडली आहे. साहित्यिक पुस्तकातील प्रत्येक पानातून आपल्याशी बोलत असतात. म्हणून पुस्तके वाचल्याने आपणास
जगण्याचा आनंद घेता येतो.’ असे विचार कवी इंद्रजित घुले यांनी काव्यवाचनातून व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य एन. एन. तंटक, मराठी विभाग प्रमुख डॉ राजाराम राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com


