👁 11 Views

रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित…? मात्र भाजपाकडून माढ्याचा लढा लढताना मोहिते-पाटील एकटे पडण्याची शक्यता

Pandharpur LIVE 19 March 2019


राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे मित्र आणि जास्त जवळीक असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपा प्रवेश निश्चित झालाय. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही सोलापूर जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांची बैठक घेऊन रणजितसिंह याना भाजपामध्ये प्रवेश देणार असल्याचं सांगितलंय. परंतु भाजपाकडून माढ्याची लोकसभा निवडणूक लढताना त्यांच्या राजकीय विरोधकांकडून मोहिते-पाटील यांना  एकटे पाडले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मोहिते-पाटील घराण्याची मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादीत कुंचबणा होत आहे. या कुंचबणेला हे कुटुंब चांगलेच वैतागले आहे. त्यामुळे एकदाचा काय तो सोक्ष-मोक्ष लावावा या मतापर्यंत मोहितेंची नवी पिढी आली आहे. रणजितसिंह यांनी भाजपात जावे म्हणून पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी भरीस घातल्याची चर्चा आहे. आपला निभाव लागणार नसल्याने रणजितसिंह यांना भाजपमध्ये आणून माढ्याची उमेदवारी देण्याची रणनिती सुभाष देशमुखांनी आखली आहे. त्याची चाचपणी मोहिते पाटील घराणेही करू लागले आहे. मात्र, राष्ट्रवादी सोडली तरी भाजपमधील आपला मार्ग सुकर नाही याची जाणीव मोहितेंना आहे. अजित पवारांचे समर्थक अशी ओळख असलेले संजयमामा शिंदे सध्या सत्तेसाठी भाजपच्या वळचणीला आहेत. मात्र, रणजितसिंहाना त्यांची मदत होण्याची सुतराम शक्यता नाही.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

आमदार भालके सोडल्यास मोहितेंच्या मागे सध्या तरी कोणी ताकदीचे दिसत नाही. भालके यांच्या पंढरपूर तालुक्यातील मोजकी ३०- ३५ गावे माढा मतदारसंघात मोडतात. त्यामुळे भालकेंचीही मदत मर्यादित स्वरूपातच होणार हे स्पष्ट आहे. अशा स्थितीत रणजितसिंह भाजपकडून लढल्यास एकटे पडण्याची भीती आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण व माण-खटाव या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद नाही. त्यामुळे रणजितसिंह यांना भाजपात जाणे सोपे आहे पण निवडून यायचे कसे? हा प्रश्न कायम असेल. सर्व काही मोदी व युतीवरच त्यांचे यशापयश अवलंबून राहील.
जातीय व सामाजिक समीकरणेही मोहिते-पाटलांच्या बाजूने जुळताहेत अशी चिन्हे नाहीत. माढ्यात मराठा व धनगर मतांचे प्राबल्य आहे. मोहिते भाजपात गेल्यास मराठ्यांची मते राष्ट्रवादीला निम्मी तर भाजपला निम्मी जाऊन मतांची विभागणी होणार हे उघड आहे. मोहितेंनी आपल्या सत्तेच्या काळात धनगर समाजाला जवळ केले नसल्याने व भाजपने आरक्षणाचा प्रश्न सोडवला नसल्याने तो समाजही रणजितसिंह व पर्यायाने भाजपला मतदान करेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळे रणजितसिंह यांच्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजप म्हणजे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशीच स्थिती आहे. आता मोहिते पाटील घराणे काय निर्णय घेते ते पाहावे लागेल. मात्र, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो दोन-तीन दिवसात घ्यावा लागणार आहे. कारण वेळ खूपच कमी राहिला आहे.
माढ्यातून पवारांनी माघार घेतल्याचे जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीत सध्या तरी शांतता आहे. यापूर्वीचे इच्छुक प्रभाकर देशमुख यांनी शांत राहणे पसंत आहे. देशमुख हे अजित पवारांचे उमेदवार आहेत अशी चर्चा मध्यंतरी होती. पवारांनी विद्यमान खासदार विजयदादांना तुम्ही पुन्हा लढा असे सांगितले आहे. मात्र, आता मला नको, मुलगा रणजितला उमेदवारी द्या असे सुचवले आहे. मात्र, रणजितसिंहांना राष्ट्रवादी पक्षातून मोठा विरोध होताना दिसत आहे. रणजितसिंह तर आता राष्ट्रवादीच्या संपर्कातही नसल्याचे बोलले जाते.
माढ्यातील शिंदे बंधूंसह करमाळ्याच्या रश्मी बागल, सांगोल्याचे दिपक साळुंखे, माणचे आमदार जयकुमार गोरे, फलटणचे रणजित निंबाळकर यांचा विरोध आहे. रामराजे यांनी आपली भूमिका अद्याप उघड केली नाही. असे असताना राष्ट्रवादी रणजितसिंह यांना उमेदवारी देऊन धोका पत्करेल का हा प्रश्न आहे. मात्र, रणजितसिंहांनी भाजपचे दार ठोठावल्याने राष्ट्रवादी सावध झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतील एक मोठा गट मोहिते- पाटील घराणे भाजपमध्ये केव्हा जाते याची वाट पहात आहे. सुजय विखे भाजपमध्ये गेल्याने बाळासाहेब थोरात गट जसा सुखावला आहे तसेच काहीसे चित्र माढ्यात मोहितेंच्याबाबत आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *