👁 13 Views

सलग 24व्या वर्षी साजरी झाली ग्रामस्वच्छतेद्वारा गोळा केलेल्या केरकचर्याची होळी

Pandharpur LIVE 20 March 2019


प्रशांत वाघमारे या प्राथमिक शिक्षकाच्या संकल्पनेतून सलग 24व्या वर्षी ग्रामस्वच्छता करुन गोळा करुन कोणताही लाकूडफाटा व गोवर्या न जाळता केरकचर्याची होळी अक्षरांगण ,जि.प. शाळा घालमेपवारवस्ती (ता.पंढरपूर ) येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरातील केरकचरा गोळा केला. प्लँस्टीक कागद खड्यात गाडून टाकले .या आधुनिक होळीची संकल्पना मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी समजाविली.यावेळी स्वरांजली घालमेहीने होळीमध्ये कोणताही लाकूडफाटा व गोवर्या न जाळण्याची शपथ दिली. समृद्धी पवार व शुभांगी पवार ह्यांनी होळीमध्ये पोळी न टाकता ती दान देण्याचे अवाहन करुन वाईट विचार चालीरितींचा नायनाट करण्याचे आवाहन केले. आरती पवार व श्रावणी साळुंखे हिने वृक्षारोपन व संवर्धनाचे महत्व पटवून दिले. समर्थ घालमे व सायली मस्के यानी व्यसनांची व दुर्गुणांची होळी करण्याचे अवाहन केले. आकाश पाटिल व प्रांजली घालमेयांनी वातावरणातील बदलाची माहिती देऊन उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी विषद केली. शंकर कुंभार व ओंकार साळुंखेयांनी पाण्याच्या बचतीचे महत्व सांगितले . होळीचे पुजन वैष्णवी घालमे व मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी केले.




या अनोख्या आधुनिक होळीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डाँ.राजेंद्र भारुड, सभापती राजेंद्र पाटिल , शिक्षणाधिकारी संजय राठोड, गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, विस्तार अधिकारी डाँ.बिभिषण रणदिवे, डाँ.पोपट लवटे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी घरीही अशीच होळी करणार आसल्याचे सांगितले . या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वच अशीच आधुनिक केरकचर्याची होळी करणार असल्याचे पालकांनी सांगितले .

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *