Pandharpur LIVE 24 March 2019
मयत सचिन शिंदे
पंढरपूर येथील सचिन शिंदे (वय ३१), (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काल रात्री एकास अटक केली आहे. सचिन शिंदे यांनी २० मार्च २०१९ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपले राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
यासंदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास अधिकारी पीएसआय डी.एस. निकम यांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून सचिन शिंदेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिपक माणिक चव्हाण (४९) , (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) यास काल रात्री ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.