👁 12 Views

अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची उद्या पंढरपूर येथे प्रचार सभा

 Pandharpur LIVE 27 March 2019

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज भरला असून 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता त्यांची संत तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, पंढरपूर येथे प्रचाराची सभा होणार आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष सुनिल वाघमारे, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ऍड. विजय मोरे, अ.भा. माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व रिपब्लिक होलार परिषदेचे अध्यक्ष एस. के. ऐवळे, ह.भ.प. अरुणभाऊ बुरघाटे महाराज, भारिप जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रा. धम्मपाल माशाळकर, युवा जिल्हाध्यक्ष सागर गायकवाड उपस्थित असतील.

सभेच्या नियोजनासाठी मंगळवार, दि. 26 मार्च 2019 रोजी सायं. 5.00 वाजता पंढरपूर येथे तातडीची बैठक भारिपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.  सुरेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

बैठकीत ऍड. सुरेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या नियोजनासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून भारिपचे शहराध्यक्ष प्रकाश दुपारगुडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मल्हारी बनसोडे, शहराध्यक्ष योगेश मोरे, एमआयएमचे शहराध्यक्ष जुबेर बागवान यांचा या समितीमध्ये समावेश आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य बी. आर. भोसले, राजकीय विश्लेषक प्रा. धैर्यशील भंडारे, पत्रकार श्रीकांत कसबे, प्रजासत्ताक जनता परिषदेचे अध्यक्ष प्रबुद्ध साठे, विनोद कांबळे, विनोद तोरणे, आदम मुजावर, अक्षय जगताप, विशाल ऐदाळे, रोहित अभंगराव, रवी सर्वगोड, अरविंद ढावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गणेश गायकवाड यांनी मानले.

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *