मंगळवेढा (प्रतिनिधी):- मंगळवेढा तालुक्यातील मेटकरवाडी-पाटखळ येथील लक्ष्मण मारुती मेटकरी यांचे शुक्रवार दिनांक ५ एप्रिल २०१९ रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान कुडाचे असलेले घर पेट घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तब्बल १ लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.यामध्ये संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. यावेळी जवळच्या तरुण युवकांनी विझविण्यासाठी प्रयत्न केले.उन्हाची दाहकता जास्त असल्यामुळे घरातील सर्वच वस्तू जळाल्या आहेत.
याठिकाणी पंचनामा करण्यासाठी तलाठी याना संपर्क केल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानिमित्त सोलापूर येथे त्या येऊ शकल्या नाहीत. सरपंच सौ उषाताई बिले,हर्षराज बिले,ग्रा. प.सदस्य परमेश्वर वाघमोडे,अप्पा मेटकरी,बापू मेटकरी, सत्यवान शेजाळ यांनी यावेळी भेट दिली.
आ.भारत भालके दिले सरपंच सौ. उषाताई बिले यांनी याबाबत माहिती दिली,याबाबत गरीब कुटुंबातील लक्ष्मण मेटकरी यांना तातडीने मदत करण्याच्या सूचना दिल्या. यामध्ये भरपूर नुकसान झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304