मुंबई : मुंबईच्या विक्रोळीतील पार्कसाईड एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटात तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका महिलेचा आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आणि जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत तिघांचे जीव गेले.
मोहम्मद सलीम बेलीम (वय 8 वर्ष), मिराज सलीम बेलीम (वय 15 वर्ष) आणि सलमा सलीम बेलीम (वय 40 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. राजवाडी रुग्णालयात उपचार सुरु असताना तिघांचाही मृत्यू झाला.
