मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा च्या अध्यक्षपदी बंडू काका शिंदे तर उपाध्यक्षपदी रविराज साबळे

पंढरपूर लाईव्ह न्युज:-
पंढरपूर शहरामध्ये शिवजयंती मोठ्या शहरामध्ये मोठ्या उत्साहात व विवीधसामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांचे वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे मध्यवर्ती शिवजन्मोत्सवची स्थापना करण्यात आली .

जिजामाता उद्यान येथे पदाधिकारी निवडी संर्भात बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी बंडू काका शिंदे, उपाध्यक्षपदी रविराज साबळे,सागर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष जाधव, खजिनदारपदी संतोष पाडोळे, संभाजी देवकर, सचिवपदी सोपान देशमुख, सहसचिव अनिकेत वाडेकर, प्रसिद्धीप्रमुखपदी विजय काळे, अविनाश मोरे, मिरवणूक प्रमुखपदी आकाश पवार, निलेश कोरके यांच्या निवडी पार पडल्या.

 यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार मराठा महासंघाचे अर्जुन चव्हाण, विजय प्रतापचे दीपक वाडदेकर, स्वाभिमानचे सागर यादव, सुनील ढोले, संभाजी ब्रिगेडचे स्वागत कदम, गोपी वाडदेकर, जगदीश पवार, धनंजय मोरे, सुनील जाधव, विकी भोसले, राष्ट्रवादीचे संदीप मांडवे, तात्या जगताप, छावाचे संतोष भोसले, सागर कदम, दत्ता काळे, मराठा महासंघाचे सुरज भोसले सुमित शिंदे, विद्यार्थी परिषदेचे किशोर मोळक, प्रसाद सातपुते, कैलास माने, विजय थोरात, काँग्रेस चे शंकर कदम, सागर अटकळे, बालाजी अटकळे, मुकेश कदम, संदीप मुटकुळे, चंद्रकांत काळे, सिद्धांत कदम, बंटी वाघ, प्रशांत सुरवसे, विकी झेंड आदी जणांनी केला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *