सोलापूर जिल्ह्याचे आमदार श्री.प्रशांत परिचारक यांचा दुरूगकर परिवारातर्फे सत्कार संपन्न

पंढरपूर 12 :-

पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे भाग्यविधाते श्री.प्रशांत परिचारक यांची सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य पदी निवड झालेबद्दल दुरूगकर परिवाराच्या वतीने श्री.मधुकर पंडीतराव दुरूगकर यांचे शुभहस्ते दाते मंगल कार्यालय, पंढरपूर येथे सत्कार संपन्न झाला. यावेळी शेकडो परिचारक प्रेमी कार्यकर्त्यांना पंच पक्कवानांचे
मिष्टांन्न भोजन देणेत आले.

सत्काराला उत्तर देताना आमदार श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, श्री.दुरूगकर परिवारातर्फे केलेला सत्काराने मी भारावुन गेलो आहे. दुरूगकर परिवाराने केलेला सन्मान माझ्या सदैव स्मरणात राहील. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन असे ही यावेळी ते म्हणाले.

कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सुरेश दुरूगकर, अरूण दुरूगकर, श्रीकांत दुरूगकर, महेश दुरूगकर, गणेश दुरूगकर, संतोष दुरूगकर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिचारक प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *