अनिल चौधरी
पुणे
विमाननगर येथील हातगाडी पाथरी व अनधिकृत शेडवर कारवाई करण्यासाठी सह.आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांच्या मार्गदर्शनखाली दिनांक 10.2.2016 रोजी कारवाई करण्यात आली , परंतु या कारवाईत लोंढे व ढोकळे यांनी सूडबुद्धीने बमव द्वेषबुद्धीने दहशद माजविण्यासाठी या कारवाईचा स्वार्थ हेतू साधण्यासाठी अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कारवाई केली. ज्या जागी जीसीबीची गरज नाही त्या ठिकाणी दहशद करण्यासाठी जीसीबी लाऊन कोणताही वीचार न करता नियम पाई तुडवून कारवाई करण्यात अली.
अनेक हॉटेलवर कारवाई करण्यात आली मात्र हॉटेलच्या शेड बरोबर त्याठिकाणी ठेवण्यात आलेल्या फ्रीज,कॉम्पुटर,हेही जीसीबी द्वारे तोडण्यात आले. तसेच सीसीडी चौकात टेम्पो वर हि जीसीबी ने कारवाई केली जी वस्तू हलवत येते तिला जप्त करून प्रशासनाच्या ताब्यत घेऊन तिच्यावर कारवाई केली जाते मात्र चिंगम स्टाईल दाखवण्याच्या नादात लोंढे व ढोकळे ह्यांनी जागेवर नियमबाह्य पद्धतीने जीसीबी ने टेम्पो तोडला , एकाद्या अनधिकृत गोष्टीवर कारवाई करतात तीच “कारवाई” ,अनधिकृत आहे असा अनधिकृत म्हणजेच नियमबाह्य कारवाई चे जनक लोंढे व ढोकळे ह्यांच्यावर कोणताच वाचक नाही म्हणून चुकीची व नियमबाह्य कारवाई करून स्वतःला विमाननगर भागात चिगंम अधिकारी म्हणून घेतात. असा अधिकाऱ्यांच्या विरोधात बहुजन मोर्चा कडून आवाज उठवण्यात आला आहे.
बहुजन मोर्चा कडून लोंढे व ढोकळे ह्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते असा अधिकाऱयांना कडून अधिकाराचा चुकूचा वापर केला जातो तसेच अधिकाराचा चुकीचा वापर करून लोकांच्या मनात दहशद निर्माण केली जाते त्यातून त्यांना दबावतंत्र खाली चिंगम स्टाईल दहशद माजवली जाते. ह्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश खडके म्हणाले कि , लोंढे व ढोकळे याना असा अमानुष पद्धतीने द्वेषभावनेने व सुधबुद्धीने हेतुपरस्पर कारवाई करता येत नाही ह्यासाठी असा अधिकाऱयांना निलंबित करा.
ऑड . वाजेद खान बोलताना लोंढे व ढोकळे ह्यांनी केलेली कारवाई नियमबाह्य आहे ह्यावर वरिष्ठांनी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा आम्ही लोंढे व ढोकळे ह्यांच्या विरोधात कोर्टात जाऊ,
ह्यावेळी मनसेच्या विशाखा गायकवाड ह्यांनी लोंढे व ढोकळे ह्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली तसेच लवकरात लवकर पाथरी व्यवसायिकांना जागा देण्यात यावी अशी मागणी केली.
ह्या नंतर भीमसेने महासंघाचे प्रदीप साठे बोलताना कारवाईला कोणाचाही विरोध नाही मात्र नियमबाह्य कारवाईला विरोध आहे नियमान कचऱ्याची टोपली दाखवून चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी केली.
विमाननगर भागातील नियमबाह्य कारवाईच्या विरोधात आंदोलनात मान्यवरांनी त्यांच्या मागण्या मांडल्या ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यलच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले हे आंदोलन बहुजन मोर्चा वडगावशेरी अध्यक्ष सोहित बनकर ह्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले ह्यावेळी अड. वाजेद खान, विशाखा गायकवाड,प्रदीप साठे,जितेंद्र भोसले किरण भालेराव,रविराज भोसले,राहुल शिरसाठ,शनीभाई शिंगारे,फिरोज खान,आशिष धोत्रे,सानी छडे, फिरोज शेख,वसीम सय्यद,गफूर शेख,किरण डोळस,रवी औदुत,महादेव वडमरे,शंकुरा शेख,प्रतीक जाधव,समसुद्दीन शेख,राजेश मस्के, नाना मस्के,सचिन चंदनशिवे,प्रसाद जठार, अमोल पवार उपस्थित होते.


