बांधकाम, खाणकाम आणि अवजड वाहन उपकरण क्षेत्रासाठी सरकार लवकरच नियामक आराखडा तयार करणार विशेष यंत्रांच्या निर्मितीसाठी एचईसी आणि कमिन्स दरम्यान सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

Loading

केंद्र सरकार लवकरच बांधकाम, खाणकाम आणि अवजड वाहन उपकरण क्षेत्रासाठी स्वतंत्र, पारदर्शक नियामक आराखडा तयार करणार आहे. मेक इन इंडियासप्ताहानिमित्त  मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अवजड उद्योग  सचिव राजन कटोच यांनी ही माहिती दिली. केंद्रीय मोटार वर्तमान कायद्याअंतर्गत कायद्यानुसार बांधकाम, खाणकाम आणि अवजड वाहन क्षेत्रातल्या उपकरणांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने प्रस्तावित नियामक आराखडयात अजून स्पष्टता आणणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.
पायाभूत सुविधांच्या विकासावर सरकारने अधिक लक्ष केंद्रीत केल्याने भारतीय अवजड वाहन आणि बांधकाम  उपकरण उद्योगात वर्षाला 40 टक्क्याने  वाढ होत आहे. महामार्ग क्षेत्रातील नियोजित वाढीमुळे  आगामी वर्षात  आपल्या विकासाची गती अखंड राहिल असे कटोच  म्हणाले.
बुलडोझरसाठी विशेष इंजन निर्मितीकरीता रांचीच्या हेव्ही इंजिनियरींग कॉर्पोरेशन आणि पुण्याच्या कमिन्स इंडियाच्या दोन कंपन्यांमध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. विविध क्षमतेच्या उद्योगांसाठी डोझरच्या निर्मिती प्रकल्‍पात एचईसी आणि रशियाच्या प्रोमट्रॅक्टर जेएससी कंपनीने एकत्रित काम करण्याचे मान्य केले आहे. या डोझरसाठी लागणाऱ्या विशेष, योग्य इंजिन आणि इतर सुटे भाग कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी  पुरवेल. क्युमिन्स इंडिया भारतीय वातावरण आणि कार्यपध्दतीला अनुकूल असणाऱ्या इंजिनची  निर्मिती भारतात करणार आहे.
बांधकाम उपकरण क्षेत्रात भारताचे स्थान भक्कम करणे हेच या चर्चासत्राचे मुख्य उद्दिष्ट होते. देशाने आतापर्यंत तंत्रज्ञान आणि नाविन्य  या क्षेत्रात केलेली प्रगती तसेच  बांधकाम उपकरण निर्मितीसाठी देशांतून मिळणाऱ्या विविध  धोरणात्मक फायद्याचे सादरीकरण या चर्चासत्रात केले गेले.
या चर्चासत्रात सरकारी तसेच उद्योग क्षेत्रातले ख्यातनाम  वक्ते सहभागी झाले होते. डीएचआचे सहसचिव विश्वजीत सहाय, फिक्कीचे  राष्ट्रीय कार्यकारी समिती सदस्य तसेच लार्सन अँड  टुब्रोच्या  मुख्य कार्यकारी ऊर्जा विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अश्विनी कुमार, एचईसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविजीत घोष, कॅटरपिलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक विवेकानंद वानमीगंथन, व्होलव्हो कस्ट्रक्शन इक्विपमेंट इंडियाचे उपाध्यक्ष डिमिट्रो कृष्णा हे सर्व या चर्चासत्रात सहभागी झाले होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *