‘लगान’मधील क्रिकेट सामना जिंकणे आणि ‘स्वदेस’ला परत येणे यालाच देशभक्ति आणि राष्ट्रप्रेम समजणार्या आजच्या पिढीने
अन् त्यांच्या आई–वडिलांनी क्रांतिकारकांची चरित्रे आणि
त्यांचा रोमहर्षक लढा मुळापासूनच वाचायला हवा.

लालाजींवर
लाठी चालवणार्या साँडर्सला महाराष्ट्राचा राजगुरु आणि पंजाबचा भगतसिंग यांनी ‘लाहोर’ला जाऊन गोळ्या घातल्या. आज मात्र बहुतांश भारतीयांना या हिंदु
हुतात्म्यांचे विस्मरण झाले आहे. क्रांतिकारकांच्या माळेतील ‘मेरूमणि’ शोभणार्या
चंद्रशेखर आझाद यांच्या आज (27 फेब्रुवारी यादिवशी) असणार्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे
अल्पचरित्र पाहूया !

चंद्रशेखर यांचा
जन्म 23 जुलै 1906 या दिवशी उत्तरप्रदेशातील झाबुआ तालुक्यात एका
गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी
आणि आईचे नाव जगरानीदेवी होते.

15 वर्षांचे असतांना चंद्रशेखर यांनी ब्रिटिशांच्या
विरोधातील मिरवणुकीत भाग घेतला. तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक करून दंडाधिकार्यांपुढे
उभे केले.त्यांनी विचारले, ‘तुझे नाव काय ?’ तेव्हा चंद्रशेखर यांनी उत्तर दिले, ‘‘मेरा नाम आझाद है !’’ दंडाधिकार्यांनी विचारले, ‘तुझ्या वडिलांचे नाव ?’ आझाद म्हणाले,
‘स्वतंत्रता !’ दंडाधिकार्यांनी विचारले, ‘रहाण्याचे ठिकाण ?’ आझाद म्हणाले ‘जेल !’ या युगप्रवर्तक उत्तरांनंतर सर्व जण त्यांना ‘चंद्रशेखर आझाद’ म्हणू लागले.

या कृत्यापायी
त्यांना 15 फटक्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. हे फटके मारण्यापूर्वी त्यांना तुरुंगातील
तिकटीवर बांधण्यात येऊ लागले. तेव्हा ते अधिकार्याला म्हणाले, ‘‘बांधते क्यों हो ? मारो । मैं खडा हूँ ।’’ ज्या एकेका फटक्यासरशी निर्ढावलेले गुन्हेगार
रडकुंडीला येत, तेथे त्यांनी प्रत्येक फटका ‘वन्दे मातरम् ।’, ‘भारत माता
की जय ।’ म्हणत खाल्ला. या मारामुळे झालेल्या जखमांवर मलमपट्टी
करण्यासाठी त्यांना तीन आणे सरकारतर्फे देण्यात आले. संतापाने खदखदत असलेल्या आझादांनी ते पैसे
अधिकार्याच्या तोंडावर फेकले आणि ते तुरुंगाबाहेर पडले. बाहेर जनसमुदाय लोटला होता. त्यांनी त्यांची गावापर्यंत मिरवणूक काढली.

‘हिंदुस्थान
रिपब्लिकन असोसिएशन’ या क्रांतिकारकांच्या संस्थेने 1925मध्ये काकोरीचा रोमहर्षक कट आखला होता. या कटात चंद्रशेखर आझाद यांचा मुख्य सहभाग होता. त्यानंतर ते भूमिगत होऊन क्रांतिकार्य करू लागले. त्यांची शरीरयष्टि दणकट आणि भव्य होती. नेमबाजीही अचूक होती. संघटनकौशल्य अप्रतिम होते.

क्रांतिकार्य
चालू असतांना एकदा चंद्रशेखर आझाद भगतसिंगांना म्हणाले होते, ‘‘हे बघ, फाशी
जाण्याची मला मुळीच हौस नाही. फाशीचा दोर तुलाच लखलाभ होवो ! माझ्यापाशी माझे हे आवडते मावजर पिस्तुल
जोपर्यंत आहे,तोपर्यंत कोण मला जिवंत पकडू
शकेल ?’’ आपले हे शब्द त्यांनी पुढे 27फेब्रुवारी 1931 ला खरे केले.

शेवटची झुंज
त्या दिवशी
प्रयागराज (अलाहाबाद) येथील
आल्फ्रेड पार्कमध्ये आपल्या सहकार्यांना भेटण्यास चंद्रशेखर आझाद निघाले होते. पोलिसांना ते कळले.त्यांच्या मागावर आलेल्या नॉट बॉवर या इंग्रज
अधिकार्याने जवळ जाऊन त्यांना विचारले, ‘तुझे नाव काय ?’ एवढे विचारून त्याने आपले पिस्तुल काढून आझाद
यांच्यावर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीचे हाड फोडून आरपार गेली. ज्या गोळीने मोठी दणकट श्वापदेही विव्हळत खाली
पडतात,मग माणसाची गत काय ? पण आझादांचे शरीर आणि मन पोलादाचे होते.त्यांनीही बॉवरवर गोळी झाडली. ती त्याच्या दंडाला लागून त्याचे पिस्तुल खाली
पडले. आझाद यांनी त्या
घायाळ स्थितीत सरपटत एका जांभळीच्या झाडाचा आधार घेतला. आपल्या प्रयत्नांनी नेमबाजी शिकलेल्या आझादांची
नेमबाजी नोकरीत नेमबाजीचे प्रशिक्षण घेतलेल्या पोलीस अधिकार्यांएवढीच चांगली होती. प्रयागराजचा (अलाहाबाद) पोलीस अधिकारी ठाकूर विश्वेश्वर सिंग एका
झुडपाआड लपला होता. त्याचे डोकेच फक्त दिसत होते. आझाद यांनी रिव्हॉल्व्हरचा चाप ओढला. गोळीने अचूकपणे वेध घेतला.

मरण समोर दिसत
असतांनाही देशबंधुत्व जागे !
असतांनाही देशबंधुत्व जागे !
नॉट बॉवरसोबत
असलेले चार भारतीय पोलीसही आझादांवर गोळ्या झाडू लागले. त्या धुमश्चक्रीतही आझादांचे देशबंधुत्व जागे
होते. त्यांनी त्या
पोलिसांना कळवळून आणि ओरडून सांगितले, ‘अरे, हिंदुस्तानी सिपाई भाईयों, तुम मेरे उपर गोलियाँ क्यों बरसा रहे हो ? मैं तो तुम्हारीही आजादी के लिये लढ रहा हूँ ।
कुछ समझो तो सही ।’ पण
त्यांची ही राष्ट्रभक्तीची हाक पोटाची टिचभर खळगी भरत गुलाम रहाणार्या त्या
पोलिसांबाबत उपड्या घड्यावर ओतलेल्या पाण्यासारखी ठरली.

आझाद यांच्या
पिस्तुलात शेवटची गोळी उरली होती. शांतपणे आपल्या मस्तकाला पिस्तुल टेकवून त्यांनी
ती गोळी झाडली. त्यांचे शरीर धरणीवर कोसळले. त्यांच्या नेमबाजीचा पोलिसांनी इतका धसका घेतला
होता की,कितीतरी वेळ ते त्यांच्या
मृतदेहाजवळ गेलेच नाहीत. आझाद यांचे स्वातंत्र्यलढ्यातील आत्मार्पण एवढे
ओजस्वी आणि धैर्यशाली आहे की,प्रत्येक
आई–वडिलांनी आपल्या मुलांना हा वृत्तांत सांगायला हवा !

मृत्यूनंतरही
क्रांतिकारकांना मान न देणारे काँग्रेसवाले !

आझाद यांच्या या
आत्मयज्ञाने सर्व जनता हळहळली. क्रांतिकारकांच्या अशा एकेका कृतीतून ब्रिटीश
साम्राज्यशाहीवर एकेक तडाखा बसत गेला. आझाद यांच्या हृदयद्रावक मृत्यूनंतरही प्रयागराज (अलाहाबाद)च्या ‘आनंद भवना’तील ढोंगी अहिंसावादी काँग्रेसवाल्यांनी
आझादांच्या अंत्यसंस्कारांसंबंधी उदासीनताच दाखवली. पद्मकांत मालवीय, पुरुषोत्तमदास टंडन यांनी पुढाकार घेऊन
आझादांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. आल्फ्रेड पार्कमध्ये ज्या जांभळीच्या झाडाआडून
लढतांना आझाद मृत्यु पावले, त्या झाडाला पूजास्थानाचे स्वरूप येऊ लागले. लोक तिथे फुले वाहू लागले, निरांजन लावू लागले. हे पाहताच ब्रिटीश सरकारने ते झाडच कापून टाकले. 1939 मध्ये तेथे जांभळीचे नवीन झाड लावण्यात आले. स्वातंत्र्यानंतर लोकांनी या बागेचे नामकरण ‘आझाद पार्क’ असे केले आणि
तेथे आझाद यांचा पुतळा उभारला.