![]()
वजन कमी करण्यासाठी पुढील सोपे उपाय करून बघा-

१) आपण दिवसभरात कितीवेळा चहा अथवा कॉफी घेता ते लक्षात घ्या.२) सकाळचा नाश्ता काय व किती असतो आणि आपण तो किती खाता ते पहा.३) दुपारचे जेवण किती वाजता घेतो आणि किती खातो ते पाहणे.४) संध्याकाळी नाश्ता म्हणून काय आणि किती खाता ते लक्षात घ्या.५) रात्रीचे जेवण किती वाजता व किती खाता ते पहा.६) नाश्ता, जेवण सोडून बाहेरील पदार्थ जसे वडापाव, मिसळपाव, शिवपुरी, पाणीपुरी, पुरीभाजी, पावभाजी, वेगवेगळ्या प्रकारचे राईस, थंडपेये, आइसक्रीम इ. चे सेवन कितीवेळा व किती मात्रेत होते, या सर्व गोष्टी लक्षात घ्या.७) आपले सध्याचे वजन किती आहे.८) किती वजन कमी केले पाहिजे.९)आपल्या कंबरेचा घेर किती आहे.१०)पोट किती पुढे आले आहे.११) कंबरेचे टायर किती वाढले आहेत.१२) इनशर्ट केल्यावर आपले शरीर आरशात नीट दिसते का ते पाहणे व इतरांना माझ्या शरीराचा आकार नीट आहे का हे विचारणे.वगैरे.
जर एवढ्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित केले तर खऱ्या अर्थाने आपण वजन घटवण्यासाठी सज्ज झालात हे लक्षात येईल. वजन घटवण्यासाठी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आपली व्हिलपवर म्हणजेच आत्मविश्वास.हा जर भरपूर असेल आणि संयम जर आपल्या अंगी असेल तर वजन घटवण्यात आपण शंभर टक्के यशस्वी होऊ शकता.
महिन्याला किमान दोन किलो वजन घटवण्याचा क्रम ठेवायचा.आणि दोन किलो ते हि महिन्याभरात सहज शक्य होते.ना मरेपर्यंत व्यायामाची गरज ना डायट च्या नावाखाली उपासमार.साधारण सहा महिन्यात सरासरी आठ ते दहा किलो वजन अगदी आरामात कमी होते.त्यानंतर ठरवायचे अजून किती कमी करायचे आहे ते.वजन कमी करण्याचा काळात शक्यतो नवे कपडे शिवू नयेत.नाहीतर लवकरच ते ढिले होऊन नव्याने शिवावे लागतील.
आता पाहूया काय केल्याने महिन्याभरात दोन किलो वजन कमी होईल.सुरवातीला सकाळचा आणि संध्याकाळचा सोडून इतर वेळचे चहा व कॉफी घेणे थांबवा.थोडेदिवस बाहेरील खाणे पूर्ण थांबवावे.(क्वचित प्रसंगी घ्यायला हरकत नाही पण अल्प मात्रेत). सकाळचा नाश्ता थोडा कमी मात्रेत घ्यावा. त्यानंतर दोन तासानी एखादे फळ घ्यावे. त्यानंतर दोन तासानी जेवण घ्यावे.यात दोन लहान चपात्या,भाजी,डाळ अथवा वरण व एक वाटी दही.मांसाहारी जेवण असेल तर दही घेण्याची गरज नाही, त्यानंतर अडीच ते तीन तासानी ताक अथवा नारळपाणी घावे.संध्याकाळचा नाश्ता म्हणून सुकी भेळ अथवा एखाद दुसरे बिस्कीट घावे व रात्रीच्या जेवणात पुन्हा दुपार प्रमाणे जेवण घेणे.(हे जे डायट मी दिले आहे ते सर्वसाधारण व्यक्तीसाठी आहे.शरीरयष्टी, अनुवंशिकता, कामाचे स्वरूप,खाण्यातल्या आवडी निवडी नुसार व्यक्तिशः आहारात बदल होऊ शकतो).
हा झाला खाण्याचा विषय. आता व्यायाम कोणता करायचा हे विचाराल तर सुरवातीला फक्त चालायला जावे.साधारण रोज पाच किलोमीटर वॉक पुरेसा असतो.पाऊण तास ते एक तास वॉक रोज न चुकता करायचा.थोडे वजन कमी झाले कि मग हळू हळू योगासने,थोडेफार वजनाचे व्यायाम आपण सुरु करायला पाहिजेत.
अशा पद्धतीने कमी केलेले वजन पुन्हा लवकर वाढत नाही.एकाच गोष्ट लक्षात ठेवा, जेवढे लवकर वजन घटवाल तितक्या लवकर ते वाढते.म्हणून संयम फार महत्वाचा आहे.
अनेकजण ‘माझे जेवण जास्त नाही हो तरी का वाढते तेच कळत नाही,’ अशी ओरड करीत असतात.पण यात काही सत्यता नाही.
वर जरी मी आहार सुचवला असला तरी आपण आपल्या विभागातील डायटीशनना गाठून त्यांच्याकडून डायट प्रोग्रॅम लिहून घ्यावा व मगच त्याचे अनुकरण करावे.यामुळे कमजोरी वगैरे येत नाही,वरचेवर आहार तज्ज्ञ यांची भेट घेऊन प्रगती पाहता येते व मनासारखे पदार्थ खाता येतात.तर आता भेटू पुढच्या लेखात एका नवीन विषयासह.शंकानिरसन व शिबिरासाठी संपर्क करा.


