भारताचे संरक्षणविषयक धोरण आणि सावरकरांचे द्रष्टेपण….

पाकिस्तानने
भारतात तसेच सीमेवर खुशाल दहशतवादी कारवाया कराव्यात आणि भारताने
हे आम्ही खपवून घेणार नाही !’, ‘संयमाचा अंत पाहू नका!’, ‘कठोर पावले उचलू !’ यांसारख्या पोकळ धमक्या द्याव्यात हे आता
नित्याचेच झाले आहे
.
 जगाच्या नकाशावर भिंग घेऊन शोधावे लागणारा इस्त्रायलसारखा इवलासा देश
शेजारील बलाढ्य अशा शत्रूराष्टांवर आपला दबदबा ठेवून आहे
,
 तर शस्त्रबळाने खमका असणारा भारत पराभूत
मानसिकता जपणार्‍या दुबळ्या शासनाच्या कह्यात असल्याने निर्बळ झाला आहे
. द्रष्ट्या सावरकरांनी त्या वेळी मांडलेले विचार
आजच्या भारताच्या अवस्थेसाठी कसे मार्गदर्शक आहेत
,हे या लेखातून जाणून स्पष्ट होईल. 2007च्या स्वातंत्र्यवीरया दिवाळी अंकातील वा.ना.उत्पात यांच्या लेखातील काही संकलित भाग या लेखात
घेतला आहे
.
 यातून सावरकरांचे द्रष्टेपण आपल्या लक्षात येईल.
1937 साली सावरकर रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटले. त्या वेळी त्यांचा मोठा सत्कार झाला. त्या वेळी एस्.एम्. जोशी (सावरकरांच्या
भाषेत श्री
..जोशी)
 म्हणाले,
‘‘आम्हाला ते सावरकर हवेत. 1910
 सालातील सावरकर आम्हाला मान्य आहेत. ज्यांनी हातात पिस्तूल घेतले आहे, ब्रिटिशांच्या छातीवर रोखले आहे, ते सशस्त्र क्रांतीचे प्रवर्तक सावरकर आम्हाला
मान्य आहेत
.’’ त्यावर सावरकर
म्हणाले
, ‘‘1910 चा सावरकर
कळायला तुम्हाला
1937 साल उजाडावे लागले. आता 1937 चा सावरकर कळायला तुम्हाला1967 साल उजाडावे लागेल. सावरकर नेहमी 30 वर्षे जगाच्या पुढे असतो.’’हे खरेच होते. कारण 1910 साली सावरकर सांगत होते, ‘इंग्रजांशी सशस्त्र युद्ध केल्याशिवाय
स्वातंत्र्य मिळणार नाही
.’
 त्या वेळी मवाळ
काँग्रेसवाले अर्ज
, विनंत्या करून स्वातंत्र्याची भीक मागत होते. त्यांना सशस्त्र क्रांतीचा विचार पटला नाही. 1937 मध्ये दुसरे महायुद्ध पेटले व मग इंग्रजांचे जे
संकट ती आमची संधी
, असे म्हणून लोक सशस्त्र क्रांतीचा घोष करू लागले.

1937 साली सावरकर सांगत होते की, ‘‘सैन्यात भरती व्हा. शस्त्रास्त्रांचे शिक्षण घ्या. देशाच्या रक्षणासाठी सैन्यबळ बलवान पाहिजे.’’ त्या वेळी या सार्‍या काँग्रेसजनांनी त्यांची रिक्रुटवीरम्हणून अवहेलना
केली
;
 पण 1962साली
चीनने भारतावर आक्रमण करून चाळीस हजार चौरस मैलांचा प्रदेश काबीज केला
.
 त्या वेळी सैन्याच्या बळाचे महत्त्व पटले. म्हणजे सावरकरांचे विचार कळायला 25 वर्षे जावी लागली.
1962
 साली सावरकर सैनिकीकरणाचे महत्त्व सांगत होते, त्याचे महत्त्व पाकिस्तानशी तीनचार युद्धे झाल्यावर कळले.
   भारताला जगातील
बलाढ्य राष्ट्र बनायचे असेल
, तर सावरकरांच्या मार्गाने गेले पाहिजे. ‘संन्यस्त खड्गनाटकात
सावरकर लिहितात
, ‘‘आजपासून पंचवीस वर्षांनीच काय पंचवीसशे
वर्षांनीसुद्धा या जगावर शस्त्राचेच साम्राज्य राहील
.
 भ्रांत अहिंसेपोटी जी राष्ट्रे शस्त्रसंन्यास
करतील
, ती आक्रमकांच्या
पायाखाली प्रथम तुडवली जातील
.’’
आक्रमण
करा
 !’ म्हणून सावरकर म्हणतात. राष्ट्राचे सैन्य शस्त्रास्त्रसज्ज पाहिजे. ते म्हणतात,
‘‘शत्रूवर सैनिक आक्रमण करणे हेच राष्ट्रीय शस्त्रबळाचे मुख्य ध्येय,
 मुख्य धर्म आहे. राष्ट्राच्या केवळ संरक्षणापुरते शस्त्रबळ जे
राष्ट्र बाळगते
, पण आक्रमणक्षम होईल इतके वाढवत नाही, तसे करणे अधर्म समजते, त्या राष्ट्राची निष्ठा एक तर भ्रांत असते, नाहीतर आतून भेकड असते. हा अंतर्गत भेकडपणा लपवण्यासाठी केलेली ती एक
वल्गना असते
. ज्या राष्ट्राचं
सैन्यबळ उघडउघडपणे आक्रमणक्षमतेच्या पायावर नि प्रमाणावर रणसज्जतेत उभे असते
. त्या राष्ट्रास संरक्षणक्षमता असतेच असते.’’ स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तानने आपल्यावर
चार
पाच वेळा आक्रमण केले. आपण फक्त प्रतिकार केला. सावरकरांच्या संदेशाप्रमाणे आपले सैन्य सतत
आक्रमणशील राहिले असते
, तर आज काश्मीरप्रश्‍न उरला नसता. आज आपल्या सैन्यात नवीन शस्त्रे येत आहेत. अणुबाँब बनवले जात आहेत. सैनिकदल आधुनिक बनवले जात आहे. हा सावरकरांच्या तत्त्वांचाच विजय आहे. गांधीवादाचा हा पराभव आहे.
1950 साली सावरकर म्हणाले, ‘‘आपल्या नैसर्गिक राष्ट्रीय सीमा अद्याप
शत्रूच्या हाती अडकलेल्या आहेत
.
 नुसती
तत्त्वज्ञानाची अंगाई गीते गाऊन त्यांचे मित्रत्व कालत्रयी साधणार नाही
. भोंगळ युतीपणामुळे जे मिळवले आहे ते पुन्हा
गमावून बसू
. ‘जशास तसेयाच राजनीतीने परकियांशी यापुढे तरी आपण वागू तरच टिकू, जिंकू. अवतीभवतीचे आक्रमक जग हातात अ‍ॅटमबाँब घेऊन
टवकारून पहात आहे
. म्हणून तुम्हीपण हाती आलेली स्वातंत्र्याची
सुवर्णसंधी साधून बलाढ्य सैन्य उभारून एका हातात आत्मज्ञान घेऊन का होईना
, पण उजव्या हातात अ‍ॅटमबाँब घेऊन आपल्या हिंदु
राष्ट्राच्या संरक्षणार्थ उभे ठाकले पाहिजे
. वेळीच चालून गेले पाहिजे.’’

देश स्वतंत्र
झाल्याबरोबर सावरकरांनी
अ‍ॅटमबाँब
निर्माण करावा
’,
 हे सांगितले. पण अहिंसेच्या धुंदीत असणार्‍या राज्यकर्त्यांनी
त्याकडे लक्ष दिले नाही
. पुढे 1974 साली इंदिरा गांधींनी अणूस्फोट केला व
गांधीवादाला तिलांजली दिली व
 1999 साली अटलजींनी अणूस्फोट केला व सावरकरांच्या
मार्गाने देश जाणार हे सूचित केले
.
सक्तीचे
सैनिक शिक्षण द्या
असे सावरकर
 1937 पासून कंठशोष करून सांगत होते. शाळा व महाविद्यालये यांतून छात्रसेना सुरू झाली. पण ती सक्तीची सुरू झाली पाहिजे. स्वातंत्र्यानंतर सैनिकदलाची उपेक्षा केली. हे पाहून सावरकर व्यथित झाले. 1954 मध्ये त्यांनी इशारा दिला, ‘‘वास्तविक पहाता ज्या दिवशी आपले भारतीय
लोकसत्ताक महाराज्य स्थगित झाले
,त्याच दिवसापासून आपले भौमिक,
 सामुद्रिक, वैमानिक शस्त्रबल वाढवण्याचे आणि ते अद्ययावत
आयुधांनी सज्ज ठेवण्याचे कार्य आम्ही तात्काळ हाती घ्यावयास पाहिजे होते
. पण गेली सोन्यासारखी सहा वर्षे आम्ही फुकट
घालवली
. नीरा
केंद्रापासून तो वनमहोत्सवापर्यंत इतर वाटेल त्या सापेक्षतः अगदी दुय्यम महत्त्वाच्या
असणार्‍या रिकाम्या नि निकाम्या उलाढालीतच काळ घालवला
. पण एक महाराज्य हाती येताच आणि त्याच्या भोवती
शत्रूंचा गराडा पडला आहे
, हे दिसताच प्रथमतः सर्व लक्ष त्या महाराज्याचे
सामूहिक संरक्षण करण्यासाठी अत्यावश्यक अशा शस्त्रबळाची सिद्धता करण्यावरच
केंद्रीत करावयास हवे होते
. पण तेवढेच तेच कर्तव्य आम्ही जवळजवळ
प्रतिज्ञापूर्वक टाळले
 !’’
संकलक : श्री पराग गोखले . संपर्क क्र. : ८९८३३३५५१७

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *