पंढरपूर दि. 13 :-
नमामी चंद्रभागा या योजनेंतर्गत चंद्रभागा
नदीचे शुध्दीकरण करण्यात येणार आहे. या
निमित्ताने पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री
बबनराव लोणीकर यांनी चंद्रभागा नदी घाट,
वाळवंट आणि नदी पात्राची पाहणी
केली. पाणी पुरवठा मंत्री यांनी नदी
पात्रातील पुंडलिक मंदीर ते विष्णुपद बंधा-यापर्यंत होडीतून नदी पात्राची पाहणी
केली. चंद्रभागा नदी शुध्दीकरणाच्या
आरखडयाबाबत संबंधित यंत्रणेकडून माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजय देशमुख, आमदार
प्रशांत परिचारक, आमदार सुभाष देशमुख, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार
नागेश पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश
जाधव, शहर पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, प्रकाश बोधले महाराज, जळगांवकर महाराज,
जोगदंड महाराज यांच्यासह मान्यवर
पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

तद्नंतर पाणी पुरवठा मंत्री लोणीकर यांनी नगरपालिकेच्या मलनिस:रण केंद्राची पाहणी करुन अधिका-यांकडून माहिती घेतली.