चंद्रभागा नदीकाठी दशक्रिया विधीसाठी सुविधा निर्माण करणार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर

पंढरपूर
दि. 13 :  तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणचे
पावित्र्य राखण्यासाठी नदी स्वच्छतेचा कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. या
कार्यक्रमाची सुरुवात पंढरपूर येथून नमामी चंद्रभागा या उपक्रमातून होत आहे.
चंद्रभागा नदीवर घाट बांधण्याबरोबरच या ठिकाणी होणाऱ्या दशक्रिया विधीसाठी सुविधा
निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांनी दिली.
चंद्रभागा
नदीवर बांधण्यात येणारा घाट, नमामी चंद्रभागा या उक्रमाची  माहिती घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे
आयोजित केलेल्या बैठकीत बैठकीत लोणीकर बोलत होते. बैठकीस पालकमंत्री विजय देशमुख,
जिल्हा परिषद अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, भारत भालके,
प्रशांत परिचारक, सुभाष देशमुख, रामहरी रुपनर, जिल्हाधिकारी रणजितकुमार,  नगराध्यक्षा साधना भोसले,महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणाचे सदस्य सचिव संतोषकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे,
अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविणकुमार देवरे, अधीक्षक अभियंता श्री. राऊत उपस्थित
होते.
पाणी
पुरवठा मंत्री लोणीकर म्हणाले, गुरसाळे बंधारा ते विष्णूपद हा चंद्रभागा नदीचा भाग
नमामी चंद्रभागा उपक्रमातून स्वच्छ करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेबाबतचा आराखडा
लवकरच तयार करण्यात येणार असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येणार
आहे.  तसेच पैठण येथे गोदावरी नदीच्या काठी
दशक्रिया विधीसाठी केलेल्या कामाच्या धर्तीवर चंद्रभागा नदी काठी या विधीसाठी
सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा.  या
आराखड्यामध्ये आमदार महोदयांच्या व 
जनतेच्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी
मंत्री महोदयांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंढरपूर शहर भूयारी गटार योजना टप्पा
क्र. 3 आणि तीर्थक्षेत्र विकास 
आराखडा  कामांची माहिती घेतली.  बैठकीस प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उप
विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार नागेश पाटील,
नगरपालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे, गट विकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, शहर
पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित
होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *