पंढरपूर-
क्रांतीजोत्यी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद,पंढरपूर यांच्या वतीने पहिली ते दहावी पर्यंत च्या विद्यार्थांच्या रंगभरण व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. राष्ट्रमाता राजमाता जिजामाता उद्यान पंढरपूर येथे सकाळी ९ वा. चित्रकला स्पर्धेला सुरवात झाली. सुमारे ६५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून किरणराज घाडगे, प्रताप चव्हाण सर हे होते . स्पर्धेचे परीक्षक म्हणून जगदीश डांगे, श्रीवल्लभ उपळकर, यांनी काम पहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे तालुकाध्यक्ष प्रसाद सातपुते, किशोर मोळक,संभाजी देवकर, अक्षय माने, पंकज यलमार,बंटी वाघ, गणेश पाटील, समाधान सूळ, राहुल मोळक, नितीन थिटे, अक्षय मोरे, विवेक नागणे, संदीप तनपुरे, अनिकेत मेटकरी आदींनी परिश्रम घेतले
स्पर्धेचे बक्षीस वितरण १२ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता जिजामाता पुतळा, जिजामात उद्यान , पंढरपूर येथे होणार आहे .

