पंढरपूर येथील विश्‍वशांती गुरूकुल सीबीएसई रेसिडेंशियल स्कुल… 4 थी राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा संपन्न

Loading

4 थी राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा संपन्न
पंढरपूर 7 जानेवारीः एमआयटी व्हीजीएस तर्फे आयोजित व एमआयटी अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग,आळंदी आणि दूरदर्शन यांच्या सहयोगाने पंढरपूर येथील विश्‍वशांती गुरूकुल सीबीएसई रेसिडेंशियल स्कुल,वाखरी येथे दिनांक 6 व 7 जानेवारी 2017 रोजी आयोजित 4 थी राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा आज रोजी यशस्वीरित्या संपन्न झाली.
राज्यभरातील 50 हून अधिक शाळांतील 500 हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.इयत्ता तिसरी ते पाचवी,सहावी ते नववी व खुला गट अशा तीन गटांच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखविले. तिसरी ते पाचवी वयोगटासाठी रिसायकल रोबो टुबी युजफुल फॉर हाऊस बिल्डिंग असा विषय होता.यांत मुंबई स्कूलचा लिक्षित देसाई व कविश पाटील या जोडीने प्रथम क्रमांक पटकाविला.सहावी ते नववी विभागासाठी वाहतूक व्यवस्थापन व नियंत्रण हा विषय होता.यामध्ये नागपूर येथील संदीपानी स्कूलचा प्रणय गव व वृषांक खापरीकर यांनी प्रथम तर पुणे येथील ब्ल्यू राईड स्कूलचा शशांक रवांदळे व पोतदार इंटरनॅशनल स्कूलचा रूद्रैया ठाकरे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.खुल्या गटासाठी रिन्युएबल एनर्जी असा विषय होता.यामध्ये मुंबई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.त्यांनी सादर केलेेेला ब्लाइंड मॅन स्मार्ट स्टिक या रोबोने प्रथम क्रमांक तर स्मार्ट व्हीलचेअर रोबोला पहिले उपविजेतेपद तर सोलर ट्रॅकर विथ डाटा लॉग इन रोबोला दुसरे उपविजेतेपद मिळाले.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंडिया स्टेम फाऊंडेशनचे प्रादेशिक संचालक व एमईएससीओ स्प्रिंग्स ठाणे,मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शाह उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी रोबो बनविण्यासाठी घेतलेले कष्ट व कल्पना स्तिमित करणार्‍या होत्या असे सांगून विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्नशील राहून प्रगती साधावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
एमआयटी एओईचे संचालक डॉ.योगेश भालेराव यांनी स्मार्ट सिटी घडविण्याबरोबरच स्मार्ट सिटीझन बनणे ही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे असल्याचे आग्रहाने नमूद केले.
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ.स्वाती कराड – चाटे यांनी या स्पर्धेच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाविषयी औसुक्य वाढत असल्याचे सांगितले.स्पर्धात्मक वातावरणातून ज्ञानवृध्दीसह व्यक्तीमत्व विकास होत असल्याने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात प्रगती साधणे शक्य होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.पुढील वर्षी ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन 11 व 12 जानेवारी 2018 रोजी होणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या अ‍ॅकॅडेमिक्स – स्कुल्स डेव्हलपमेंट अ‍ॅन्ड ट्रेनिंगचे प्रकल्प संचालक डॉ.पी.एन.प्रसाद यांनी संपूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *