पंढरपूर नगरपरिषदेची चैत्री यात्रेसाठी यंत्रणा सज्ज
पंढरपूर-
अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.०७-०४-२०१७ रोजी चैत्री यात्रा भरत असुन येणा-या भाविक वारक-यांना सुविधा पुरविण्याकामी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झालेली आहे. यात्रेकरुंना यात्रा कालावधीमध्ये खालीलप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत. नगरपरिषदेने सावरकर पुतळा ते महाद्वार, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, येथील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहिम हाती घेवुन अतिक्रमण काढणेत आलेली आहेत.आतयेणा-या रस्त्यांना बॅरीगेटींग केले आहेत. जुना दगडी पुल ते पुंडलिक मंदीर व या मुख्य रस्त्याला लागुन नदीपर्यंत उपरस्त्याची आखणी करण्यात आली आहे. तसेच पुंडलिक मंदीर ते दगडी पुलापर्यंत ६ हायमास्ट दिवे, प्रत्येक घाटासमोर असलेल्या लोखंडी पोलवर असे एकुण ३० मेटल हायमास्ट दिवे लावण्यात आले असुन सदर दिव्यांचा प्रकाश संपुर्ण वाळवंटात पडणार आहे. त्याचप्रमाणे यात्रेकरुंच्या सोईसाठी संपुर्ण दर्शन बारी मार्ग, ६५ एकर मध्ये हायमास्ट, सोडियम व्हेपर दिवे बसविण्यात आले आहेत. व या ठिकाणी १२० नळ कनेक्शन देण्यात आली आहे. अनिल नगर येथील पाण्याच्या टाकीवरुन स्वतंत्र पाईप लाईन द्वारे यात्रेकरुंना पिण्याचे पाणी मिळावे या हेतुने नदीच्या वाळवंटामध्ये ५४ नळ बसविण्यात आले आहेत. तसेच वाळवंटात विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येवुन ४०० कर्मचा-यांव्दारे संपुर्ण नदी वाळवंट स्वच्छ करण्यात आलेले आहे. नगरपरिषदेचे कर्मचारी नेमुन त्याठिकाणी उघड्यावर शौचास बसु नये म्हणुन विशेष टीम नेमण्यात आली आहे. तसेच नदी पात्र, पत्राशेड, ६५ एकर, मंदिर परिसर येथे आगीची दुर्घटना होवु नये म्हणुन २४ तास २ अग्निशमन वाहन उभे करण्यात आलेले आहे. शहर व मंदीर परिसरात दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. गोपाळपुर नाका येथील पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शन द्वारे उपलब्ध करुन दिले आहे. याठिकाणी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात एकुण ६५ हातपंप व १३० विद्यात पंप उपलब्ध असुन याद्वारे यात्रेकरुंना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रा कालावधीत पिण्याचे पाणी किमान टँकर द्वारे संपुर्ण शहरात मागणीनुसार पाणी पुरविण्यात येणार आहे. यात्रा कालावधीपुर्वी शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली असुन यात्रा कालावधीमध्ये शहरात स्वच्छता रहावी म्हणुन नियोजन बद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. नगरपरिषदेच्यावतीने सफाई कर्मचा-यांद्वारे स्वच्छता करण्यात येत आहे. तसेच यात्रा कालावधीमध्ये ३६ घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत चालु राहणार आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील वाहने, कॉम्पॅक्टर, डंपरप्लेसर, डंपिंग ट्रॉलिने कंटेनर मार्फत दररोज कचरा उचलण्यात येणार आहे.
एन वायरोसॅन तंत्राचा वापर करुन जैविक पद्धतीने नदीच्या पात्रात होणारी घाण दुर्गंधीयुक्त वास कचरा व घाण कुजविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाणार आहे. तसेच शहरामध्ये दोन ठिकाणी सुलभ शौचालये ६४ सीट, वाल्मिक आवास योजनेतुन बांधण्यात आलेले ३ ठिकाणी २५ सीट, ३७ ठिकाणी २१८ सीट सार्वजनिक संडास असुन ६५ एकर प्रिफॅब्रिकेटेड संडास बसविण्यात आलेले आहेत. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या २२ सुलभ शौचालयामध्ये १४८९ सीटचे संडास उपलब्ध होणार आहेत.
शहरात यात्रा कालावधीमध्ये पत्राशेड दर्शनबारी, दर्शन मंडप, ६५ एकर, चंद्रभागा वाळवंट या ४ ठिकाणी यात्रेकरुंच्या सोईसाठी प्रथमोपचार केंद्र उघडण्यात आले आहेत. तसेच यात्रा कालाधीत कॉलरा हॉस्पिटल येथे ५० कॉटचे हंगामी स्वरुपाचे रुग्णालय स्थापित करण्यात आले असुन शहरामध्ये प्रथमोपचार केंद्रावर १५ वैद्यकीय अधिकारी, १५ परिचारीका, कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. तसेच १०८ च्या ०६ अॅम्बुलन्स २४ तास कार्यरत राहणार आहेत. शहरामध्ये उलटी, जुलाबाचे पेशंट आढळल्यास त्वरीत (०२१८६) २२३८८२ या दुरध्वनीवरुन दवाखान्याशी संपर्क साधावा. तसेच यात्रा कालाधीमध्ये संपुर्ण यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष पंढरपूर नगरपरिषद मुख्य कार्यालय येथे उघडण्यात आले आहे. त्याचा दुरध्वनी क्र.२२३२५३ असा आहे. नगरपरिषद टोल फ्री नंबर १८००२३३१९२३ आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणुन नगरपरिषदेचे नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, उपनगराध्यक्ष सुजाता त्रिंबक बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, सर्व सभापती व नगरसेवक, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशील असल्याची माहीती जनसंपर्क अधिकारी सुनिल वाळुजकर यांनी दिली. तसेच यात्रा कालावधीमध्ये शहरातील सर्व स्थानिक नागरीकांनी स्वच्छता व आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी सहकार्य करावे असे अवाहन करण्यात येत आहे.
सर्व ताज्या घडामोडी, मनोरंजन व विविध माहितीसाठी बघत रहा…
जगभरातील लाखो मराठी माणसांनी पसंत केलेले एकमेव ई-न्युज वेब पोर्टल व अॅन्ड्रॉईड अॅप
‘पंढरपूर लाईव्ह’
लॉग इन करा
www.pandharpurlive.com
अधिक माहितीसाठी आमचा व्हाटसअप क्र.
8552823399
