![]()
फुलचिंचोली येथे रविवारी लक्ष्मण शक्ती सोहळा
फुलचिंचोली, प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे भावार्थ रामायण चालू असून त्यातीलच लक्ष्मण शक्ती सोहळा कार्यक्रम रविवार दि. 9 रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कल्याणराव पाटील यांनी दिली. हा सोहळा हनुमान मंदिर परिसर परांगणात होणार आहे.
लक्ष्मण शक्ती लागली, जेव्हा धरी अक्राळ विक्राळ रूप तेव्हा गीरी द्रोण आणूनी शीग्र अठविला. नमस्कार माझा तथा मारूतीला या रामायणातील ओवीने लक्ष्मणची शक्ती संपन्न होणार आहे. हा शक्ती सोहळा रविवारी सायंकाळी 6 वा. सुरू होऊन सोमवारी पहाटे यांची सांगता होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे वाटप होणार असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. वाचक व सूचक यांनी रविवार सायंकाली 6 वाजेपर्यंत नावे नोंदण्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी यल्लाप्पा गायकवाड, नागन्नाथ शिंदे, बबन काळे, दादा शिंदे, बाळु कोतवाल, ब्रम्हदेव डोंगरे, सुदाम जाधव, हरी आवताडे, ठ्ठिल काळे, बाई पोतदार, यल्लाप्पा कुंभार आदी परिश्रम घेत आहेत.
……………………
