पंढरीतील विठ्ठल मंदिर परिसरातील मंगल लाॅजवर पोलिसांची धाड… लाॅजवर वेश्याव्यवसाय… दोन जोडप्यासह लाॅज मालक पोलिसांच्या ताब्यात!

पंढरीतील विठ्ठल मंदिर परिसरातील मंगल लाॅजवर पोलिसांची धाड… लाॅजवर वेश्याव्यवसाय… दोन जोडप्यासह लाॅज मालक पोलिसांच्या ताब्यात!
पंढरपूर Live 6 April 2017
शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळच पश्चिमद्वार समोरच्या मंगल लाॅजवर आज पंढरपूर शहर पोलीसांनी धाड टाकुन कारवाई केली. दोन जोडप्यासह, लाॅज मालक जयंत पुराणिक यास ताब्यात घेतलं असुन चौकशी सुरु आहे. अशी माहिती  पंढरपूर शहर पोलिस ठाणे क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोसावी यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
मंगल लाॅज वर वेश्याव्यवसाय सुरू  असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पंढरपूर शहर पोलिसांकडून सदर  कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेतलेले दोन्ही जोडपे १८ वर्ष वयाच्या पुढील आहेत.
महाराष्ट्राची अध्यात्मीक राजधानी असणा-या भुवैकूंठ पंढरपूर मध्ये प्रत्यक्ष पंढरीचा राजा पांडुरंगाच्या मंदिरालगतच वेश्याव्यवसायाला थारा देणा-या या लाॅजवर कायम स्वरुपी बंदी आणुन लाॅज चालकावर कडक कारवाई व्हावी. अशी अपेक्षा भाविकांमधून व नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
यापुर्वीही या लाॅज वर कारवाई झाली होती परंतु नंतर पुन्हा ‘जैसे थे’ येथे राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू होत असेल तर ही बाब गंभीरच म्हणावी लागेल.
या बाबतीत स्वतः जिल्हाधिकारी व सोलापूर ग्रामीण पोलीस अधिक्षकांनीच लक्ष घालुन यावर कडक कारवाई करून कायमस्वरुपी उपाययोजना करणं आवश्यक आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *