सोनू निगमचे समर्थन करणा-या दोघांना चाकून भोसकलं

सोनू निगमचे समर्थन करणा-या दोघांना चाकून भोसकलं

भोपाळ, दि. 21 – मशिंदीवरील भोंग्यामुळे झोप मोड होत असल्याचे वादग्रस्त ट्विट करणारा बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सध्या चर्चेत आहे. त्यानं केलेल्या अजान ट्विटचा वाद अजूनही मिटलेला नाही.

सोशल मीडियावरही काही नेटीझन्स सोनू निगमच्या समर्थनात मत मांडत आहेत तर काही जण त्याला खडेबोल सुनावत आहेत. अशातच सोनूनं मांडलेल्या मताचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दर्शवणं मध्य प्रदेशातील दोन तरुणांना चांगलंच महागात पडले आहे.

फेसबुकवर सोनूचं समर्थन करणारी पोस्ट केल्यानं दोन गटात बाचाबाची झाली. यानंतर हा वाद इतक्या टोकाला गेला निगमचे समर्थन केल्याने मुलांच्या एका गटाने त्यांना चाकूने भोसकले. उज्जैन येथील फ्रीगंज परिसरातील हा धक्कदायक प्रकार आहे. जखमी मुलाचे नाव शिवम असून त्याच्या मित्रालाही संशयितांनी भोसकलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *