भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू ३० लढाऊ विमान रडारावरून बेपत्ता
आसाममधील तेजपूर येथून विमानाचे उड्डाण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलाचे सुखोई एसयू ३० लढाऊ विमान रडारावरून बेपत्ता झाले आहे. आज सकाळी ११.३० वाजता विमानाचा रडार केंद्राशी संपर्क तुटला. आसाममधील तेजपूर येथून विमानाने उड्डाण केले होते.
सुखोई ३० विमानाने तेजपूर येथून सकाळी ९.३० वाजता उड्डाण केले होते. तेजपूरपासून ६० किलोमीटर अंतरावर या विमानाचा संपर्क कक्षाशी असणारा संपर्क तुटला व ते बेपत्ता झाले. अरुणाचल प्रदेशमधील दोलसंग जवळ हे विमान बेपत्ता झाले. हा प्रदेश भारत आणि चीन यांच्या सीमेलगत आहे.
नियमित सरावासाठी उड्डाण केलेल्या या विमानात दोन वैमानिक आहेत. सकाळी ११.३० वाजता या विमानाशी संपर्क तुटल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूवींही भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० एमकेआय विमान १५ मार्च रोजी राजस्थानमधील बारमेर येथे कोसळले होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





