👁 8 Views

पाकची मदत बंद, मिळणार फक्त कर्ज : ट्रम्प

पाकिस्तानला शस्त्र खरेदीसाठी मिळत असलेले अनुदान बंद करून त्याचे रुपांतर कर्जात करावे असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. आपल्या वार्षिक बजेटमध्ये हा प्रस्ताव कॉंग्रेस समोर ठेवला आहे. व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय विदेश मंत्रालयाचा असणार आहे. ट्रम्प प्रशासनाने विदेश मंत्रालयाने काय तो निर्णय घ्यायचा आहे असे सांगितले आहे. ट्रम्प प्रशासनाचे पहिले वार्षिक बजेट मंगळवारी अमेरिकी कॉंग्रेससमोर सादर केले जाणार आहे.

तत्पूर्वी व्हाईट हाऊसमधील बजेट प्रबंध कार्यालयाचे निदेशक मिक मुल्वेनी यांनी पत्रकारांशी बोलताना; ‘सैन्य वित्तपोषण कार्यक्रमांतर्गत अमेरिकेकडून पाकिस्तान आणि इतर देशांना मिळत असलेले अनुदान यापढे बंद करून त्याचे कर्जात रुपांतर करा अशा प्रकारचा प्रस्ताव कॉंग्रेस समोर मांडण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तो मांडला आहे. मात्र हा प्रस्ताव म्हणजे अंतिम निर्णय असून त्याची अमलबजावणी विदेश मंत्रालयाने योग्य तो निर्णय घेवून करावयची आहे; असे म्हटले आहे.

अमेरिकेकडून पाकिस्तान, इस्राइल आणि इजिप्त या देशांना आर्थिक मदत म्हणून अनुदान दिले जाते. या अनुदानाचा वापर हे देश शस्त्र खरेदीसाठी करतात. मात्र सध्या जगावर जागतिक दहशतवादाचे सावट तीव्र झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या संरक्षणात वाढ करण्याचे ठरवले असून त्यांच्या सैन्य दलाचे बजेट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे अनुदान कर्जात रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे तज्ञांचे मत आहे.

अनुदानाचे रुपांतर कर्जात केल्याने पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाणार आहेत. हेच चलन सैन्यदलाच्या बजेटकडे वळवता येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ट्रम्प यांनी कॉंग्रेस समोर मांडलेल्या आपल्या प्रस्तावात इस्राईल आणि इजिप्त या देशांना देण्यात येत असलेले अनुदान तसेच ठेवावे असे म्हटले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *