मुंबई- बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडाची चौकशी करणार्या पोलिस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कानोर यांच्या पत्नी दिपाली यांची वाकोला भागात चाकू भोसकून हत्या झाली आहे. या घटनेनंतर ज्ञानेश्वर कानोर यांचा मुलगाही बेपत्ता आहे.
मिळालेली माहिती अशी की, ज्ञानेश्वर कानोर (42) यांच्या पत्नीची आज (बुधवारी) पहाटे 3 वाजता जीके पार्क सोसायटीत निर्घृण हत्या झाल्याची माहिती वाकोला पोलिस ठाण्याच्या वायरलेस मोबाईल व्हॅनला मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेऊन दीपाली हिला बीएन देसाई हॉस्पिटलमध्ये हलवले. मात्र, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दिपालीच्या मृतदेहावर चाकू भोसकल्याच्या अनेक जखमा आढळल्या आहेत. या हत्येप्रकरणी मात्र पोलिसांनी मौन धारण केले आहे.
बेपत्ता मुलावर संशय…
या हत्याकांडाची माहिती स्वत: ज्ञानेश्वर कानोर यांनी पोलिसांना दिली. घटनेनंतर त्यांचा मुलगा बेपत्ता आहे. त्यामुळे मुलावर पोलिसांचा संशय आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे




