👁 15 Views

‘बाहुबली’गिरी तिकडे कर्नाटकात दाखवा!

कोणतेही राज्य व त्या राज्याची भाषा एकमेकांचे दुश्मन नाहीत. तुम्हाला, म्हणजे रोशन बेगसारख्यांना पाकड्य़ांचा जयजयकार चालतो, नव्हे त्यासाठी प्रोत्साहनच दिले जाते. पण त्याच पाकड्य़ांना अंगावर घेणाऱ्या महाराष्ट्राचा जय तुम्हाला नको असेल तर रोशन बेगसारख्या नादान माणसाची लुंगी उतरवून त्याची डीएनए चाचणी करायलाच हवी. त्यांच्या अंगात स्वच्छ स्वदेशी रक्त असूच शकत नाही. ही अवलादच देशाला भारी पडत आहे; पण महाराष्ट्र त्यांच्या छाताडावर बसून ‘जय महाराष्ट्र’चा गजर केल्याशिवाय राहणार नाही!

जय महाराष्ट्र!

सध्या महाराष्ट्रातील राजकारण्यांना ‘बाहुबली’ आणि ‘कटप्पा’ यांच्यात भलताच रस वाटत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपण ‘बाहुबली पार्ट टू’ दाखवायला तयार आहोत, असे आव्हान राजकीय विरोधकांना दिले आहे. हा जो काही ‘बाहुबली पार्ट टू’ आहे तो तुम्ही दाखवायचा तेव्हा दाखवाच, पण आधी मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या कर्नाटक सरकारला बाहुबलीचा निदान ट्रेलर तरी दाखवा एवढी आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मराठीपणाचा अभिमान असेल तर त्यांनी तत्काळ बेळगावात जाऊन मराठीजनांस दिलासा द्यायला हवा. सीमा भागातील मराठीजनांना अपमानित करण्याचे व त्यांच्यावर अत्याचार करण्याचे नवे कारस्थान रोज तेथील राज्यकर्ते रचत आहेत व महाराष्ट्राचे तकलादू मराठी राज्यकर्ते कानडय़ांच्या दमनचक्रावर मूग गिळून गप्प बसले आहेत. कर्नाटकचा एक भ्रष्ट आणि बकवास मंत्री रोशन बेग याने धमकी दिली आहे की, सीमा भागात निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. तसा कायदा विधानसभेत आणण्याचे नक्की झाले आहे. कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार आहेत. बेळगावच्या महानगरपालिकेवर तर मराठीजनांचा भगवाच फडकला आहे. इतर नगरपालिकांतही महाराष्ट्रवादी सदस्य मोठ्य़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्या ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यावर बंदी आणणाऱया रोशन बेगने हिंदुस्थानचे नागरी स्वातंत्र्य आणि घटनेवरच थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ६०-६५ वर्षांपासून सीमावाद आहे व सध्या हा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात उद्धाराची वाट पाहात आहे. मुळात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रोशन बेगने अशी बांग देणे हा न्यायालयाचा अपमान आहे. अन्य राज्यांचा जयजयकार करणे हा घटनात्मकदृष्ट्य़ा गुन्हा कसा ठरू शकतो? खरे म्हणजे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’वर घातली जाणारी बंदी हा आता फक्त मराठी अस्मितेचाच मुद्दा राहिलेला नसून
राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा मुद्दा
बनलेला आहे. रोशन बेग व त्यांच्या पिलावळीने मधल्या काळात वक्फ बोर्डाच्या जमिनी गिळून इस्लामद्रोह केलाच आहे. असा हा भ्रष्ट व नादान मंत्री ‘जय महाराष्ट्र’च्या विरोधात बकवास करतो हा शिवरायांचा अपमान आहे. कर्नाटकात अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवून पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले जातात त्या पाकड्य़ांविरुद्ध बोलण्याची हिंमत कधी त्या लांड्य़ा रोशन बेगने दाखवली आहे काय? हिंदुस्थानात दहशतवाद घडविण्याचे सूत्रधार कर्नाटकच्या भूमीवरूनच देशद्रोही कारवाया करीत होते. पाकिस्तानी ‘आयएसआय’चे हात रोशन बेगच्या डोळ्य़ांसमोर अतिरेकी हल्ल्यांचे ‘महान राष्ट्रीय कार्य’ करीत असतानाही हा रोशन बेग त्यांच्या हिरव्या लुंगीतून डोके बाहेर काढायला तयार नाही; पण आता ‘जय महाराष्ट्र’ बोलणाऱ्यांना मात्र इशारे देत फिरत आहे. हा सरळ सरळ मस्तवालपणा आहे. मराठी भाषा व मराठी संस्कृतीच्या रक्षणासाठी लढणे हा गुन्हा ठरत नाही, तो अधिकार देशाच्या घटनेनेच मराठी जनतेला दिला आहे. कर्नाटकातील या कानडी वरवंट्य़ाची दखल महाराष्ट्राचे सरकार आता तरी घेणार आहे काय? बेळगावसह मराठी भाग महाराष्ट्रात येईल तेव्हा येईलच, पण हे जे दमनचक्र व मराठी अस्मितेस तुडविण्याचे प्रकार कर्नाटक सरकारकडून चालले आहेत ते तरी थांबवायचा प्रयत्न करा. महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न व तेथील बांधवांच्या समस्या निवारणासाठी चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची नेमणूक केली आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहितील. वकिलांकडून कायदेशीर बाजू समजून घेऊन हे पत्र लिहिले जाईल. पाटील यांनी सरकारी पातळीवर सरकारी पद्धतीने हे जे काही करायचे आहे ते करावेच, पण रोशन बेग काय किंवा मराठीद्वेषाचा वडस असलेले कर्नाटकचे सत्ताधारी काय, त्यांना हा ‘शब्दां’चा मार पुरेसा नाही. त्यामुळे त्यांना शहाणपण सुचण्याचीही शक्यता नाही. त्यापेक्षा निदान चंद्रकांत पाटलांनी तरी कोल्हापुरातून
बेळगावचा रस्ता धरावा
 तेथील जनतेस दिलासा द्यावा. त्यांनी व महाराष्ट्राच्या इतर मंत्र्यांनी बेळगावात जाऊन ‘जय महाराष्ट्र’चा गजर केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होणार नाही. उलट त्यांच्या धाडसाचे महाराष्ट्र कौतुकच करील. बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांवर केले जाणारे अत्याचार हे अतिरेकी कारवायांइतकेच भयंकर आहेत. मात्र तरीही या प्रश्नावर कोणताही राष्ट्रीय पक्ष तोंड उघडत नाही. अशा वेळी त्यांच्या अंगावर ‘राष्ट्रीय’ झूल चढलेली असते. मग काही दशकांपूर्वी विनाकारण घालून ठेवलेला सीमावादाचा घोळ संपवायचा कोणी? दोन प्रांतांमधील असला तरी हादेखील शेवटी प्रश्नच आहे आणि एकटी शिवसेनाच त्याविरुद्ध एल्गार पुकारत असते. राज्याराज्यात अशा अनेक प्रश्नांची भिजत घोंगडी दशकानुदशके पडली आहेत आणि त्या त्या राज्यांतील प्रादेशिक पक्षच त्या प्रश्नांवर आवाज उठवत आहेत. म्हणूनच कोणी कितीही चिरडण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या देशात प्रादेशिक पक्षांचा आवाज बुलंदच राहणार आहे. महाराष्ट्रात उत्तर प्रदेश, बिहारचे स्थापना दिन साजरे होतात. तिकडे मोदी, शहा सर्वोच्चपदी चढले म्हणून इथे आमच्या गुजराती बांधवांची छाती गर्वाने फुगते. उत्तर प्रदेशातही राजभवनात महाराष्ट्र दिन साजरा झाला व स्वतः तेथील मुख्यमंत्री योगी महाराज त्या सोहळ्य़ास उपस्थित राहिले. मुंबईसह महाराष्ट्रात कानडी मंडळींच्या संस्थादेखील त्यांचे सांस्कृतिक आणि भाषिक कार्य जोरात करीत आहेत. त्यांना कोणी रोखलेले नाही. शेवटी कोणतेही राज्य व त्या राज्याची भाषा एकमेकांचे दुश्मन नाहीत. तुम्हाला, म्हणजे रोशन बेगसारख्यांना पाकडय़ांचा जयजयकार चालतो, नव्हे त्यासाठी प्रोत्साहनच दिले जाते. पण त्याच पाकड्य़ांना अंगावर घेणाऱ्या महाराष्ट्राचा जय तुम्हाला नको असेल तर रोशन बेगसारख्या नादान माणसाची लुंगी उतरवून त्याची डीएनए चाचणी करायलाच हवी. त्यांच्या अंगात स्वच्छ स्वदेशी रक्त असूच शकत नाही. ही अवलादच देशाला भारी पडत आहे, पण महाराष्ट्र त्यांच्या छाताडावर बसून ‘जय महाराष्ट्र’चा गजर केल्याशिवाय राहणार नाही!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *