भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये ताळमेळ नसल्याने पत्रकारांना जाम त्रास सहन करावा लागला. दिल्लीमध्ये भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. बुधवारी या बैठकीचा दुसरा दिवस आहे. ही कार्यकारिणी कव्हर करण्यासाठी, त्याचं वार्तांकन करण्यासाठी अभिनेता आणि खासदार मनोज तिवारीने पत्रकारांना निमंत्रण पाठवलं होतं. मात्र पत्रकारांना बघताच केंद्रीय उर्जामंत्री यांची तार सटकली. त्यांनी पत्रकारांना सभागृहातून बाहेर जायला सांगितलं. तिवारी आणि गोयल यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षामुळे पत्रकारांचं सँडविच झालं.
गोयल, पत्रकारांना बाहेर जा असं सांगताना म्हणाले की जी गोष्ट नेत्यांना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगायची आहे ती पत्रकारांसमोर सांगणं योग्य नाही. असं झालं नाही तर मग या कार्यकारिणीला काही अर्थ राहात नाही. पत्रकारांनी तिथून निघायला सुरू करताच गोयल यांनी मोदी सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचायला सुरूवात केली. तर त्याचवेळी सभागृहातील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर वाहिनी आणि वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी थांबण्याची विनंती करायला सुरूवात केली होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





