उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरु….विक्रम शिरसट मित्र मंडळाने पेढे वाटून केला आनंद साजरा
येथील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत होते.व त्यांना खाजगी अतिदक्षता विभागात महागडे उपचार घेण्याशिवाय पर्याय राहीला नव्हता.अनेक वेळा गरीब रुग्णांना सोलापूर येथे छत्रपती सर्व्वोपचार रुग्णालयात पाठवावे लागत होते.उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सुरु करावा यासाठी विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या वतीने अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती.या पाठपुराव्यास यश आले असून काल पासून येथील अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आल्याने विक्रम शिरसट मित्र मंडळाने याठिकाणी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. यावेळी बोलताना विक्रम शिरसट म्हणाले की,येथे येणार्या रुग्णांची अर्थिक परिस्थीती अतिशय हालाखीची असते.ग्रामिण भागातून आलेल्या अनेक गरीब रुग्णांकडे पुन्हा गावाकडे जाण्यासाठीॅ सुध्दा पैसे नसल्याचे अनेक वेळा अनुभवास आले आहे.असे असताना जेव्हा ते येथे रुग्णास घेवुन येतात तेव्हा त्यांना खाजगी दवाखन्यात नेण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला जातो यावेळी रुग्णाचे व नातेवाईकांचे हाल बघवत नाहीत.राज्य शासनाने पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याचे लक्षात घेवुन येथील उपजिल्हा रुग्णालयास सर्वत्या सुविधा व निधी उपलब्ध करुन दिला आहे.असे असताना देखील येथील अनेक विभाग बंद अवस्थेत असल्याचे दिसून येते.आम्ही अतिदक्षता विभाग सुरु व्हावा म्हणून वारंवार पाठपुरावा केला होता.आमच्या मागणीची दखल घेतल्यामुळे आम्ही पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत. यावेळी अभिनव माने,बारीक वाघमारे,लिंबाजी कोळी,महावीर कांबळे,अतुल माने,गोविंद मेटकरी आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!