👁 10 Views

खळबळजनक… पंढरीत वाहतुक पोलिसाला भर चौकात मारहाण..!

पंढरपूर Live 25 may

दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा करणा-या वाहतुक पोलिसालाच एकाने भरचौकात मारहाण केल्याची खळबळजनक घटना आज पंढरीत घडली आहे.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी ११ वा। येथील सहकार चौकात वाहतुक शाखेचे पोसई निलेश गोपाळचावडीकर, पो.काँ. वाघमारे, पो.काँ. काकडे यांचेसह पो.ना. दौलतराव लिंगप्पा तळवार हे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणारे वाहनांवर.कारवाई करीत होते. यावेळी आरोपी जनार्धन यल्लाप्पा पवार (वय 23), रा. जुनी वडार गल्ली, पंढरपूर याचे नंबर नसलेल्या स्प्लेंडर प्लस मोटारसायकलच्या कागदपत्रे व लायसन्सबाबत विचारणा केली असता आरोपीने “तुम्ही कोण मला कागदपत्रे विचारणार?” असे म्हणत पो.ना. तळवार यांची गच्ची धरून खाली पाडले. यात तळवार यांचे दोन्ही पायाला खरचटले आहे. सरकारी कामात अडथळा आणला व मोटार वाहन कायद्याचं उल्लंघण केलं म्हणून संबंधीत आरोपीवर शहर पोलीस ठाणेत गुन्हा नोंदविणेत आला आहे.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *