👁 13 Views

शहीद कामटे संघटनेच्या वतीने स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर जंयती साजरी

सचिन व्हटे
सांगोला /प्रतिनिधी : – सांगोला तालुक्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सांगोला यांच्या वतीने देशभक्त स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची १३४ वी जंयती उत्साहात साजरी करण्यात आली. स्टेशन रोड येथील तोरणा मुख्यालयात उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व अभिवादन केले. यावेळी जयंती निमित्त सचिव अच्युतराव फुले यांनी आपले विचार व्यक्त करून त्यांचे कार्य देशासाठी मोलाचे असल्याचे सांगितले. यावेळी संस्थापक निलकंठ शिंदे (सर), संदीप बनकर, प्रकाश खडतरे, लक्ष्मीकांत लिगाडे, पद्मनाथ जगदाळे, विठ्ठलपंत शिंदे, ओंकार सपाटे यांनीही जयंती निमित्त उपस्थित राहुन अभिवादन केले. यावेळी संघटनेचे सर्व सदस्य व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *