👁 13 Views

हेलिकॉप्टर कोसळले त्यातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस वाचले इथवर सर्वाना माहित आहे…..पण ज्या घरावर हेलिकॉप्टर कोसळले त्यांचं काय झालं…

गजानन गायकवाड...

पंढरपूर LIVE:
 मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर भरत कांबळे यांच्या घरावरचं कोसळल्याने त्यांच्या घरातील भींती पडल्या आहेत. त्यात जार जण जखमीही झालेत. घराच्या अंगणातचं हेलिकाॅप्टर असल्याने पोलिसांनी घरातल्या लोकांना साधी काडेपेटी देखील पेटवू नका, असा सज्जड दम दिला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून या घरात चूल पेटली नाही. घरात 4-5 लहान मुलं उपाशी आहे. परिवारातील चार जण रुग्णालयात आहे. त्यांच्याही खान्याचे हाल होत आहेत कारण घरात जेवणच बनत नाहीये. त्यात आता पाऊस कधीही पडु शकतो, पण कांबळे कुटुंबीयांच्या डोक्यावर छप्पर नाही. घरात धान्य असूनही चूल पेटवण्याची सोय नाही. पोलिसांचा चोवीस तास पहारा त्या घरावर आहेत.सुरक्षेचा दृष्टीकोनातून हे सांगितलं जातंय, चुलच पेटवली नाहीतर खायचं काय आम्ही????
असा सवाल आपतिग्रस्त कांबळे कुटुंबिय करत आहेत….. 
तुमचे ते जीव आहेत आणि सामान्यजन ज्यांच्या जीवावर मुख्यमंत्री म्हणून मिरवता त्यांचे जीव नाहीत काय??? कांबळे कुटुंबियांला मानसिक त्रास देणाऱ्या पोलीस प्रशासनाचा आणि या त्या कुटुंबीयाच्या परिस्थितीकडे दुर्लक्षित करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा 
#निषेध#निषेध#निषेध
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *