– अमित शाह यांची पदाधिकार्यांशी तासभर चर्चा
– सदस्य संपर्क अभियान राबविण्याचे आदेश
– पक्षाच्या कार्यविस्तार अभियानाचा आढावा
नागपूर, २९ मे
येत्या २०१९ मध्ये होणार्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली आहे. आगामी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज नागपूरला धावती भेट देऊन रविभवन येथे तासभर शहर अध्यक्षांसह काही निवडक पदाधिकार्यांशी चर्चा केली. शिवाय सदस्य महाअभियानादरम्यान नोंदविलेल्या सदस्यांशी संपर्क साधण्याचे निर्देशही त्यांनी पदाधिकार्यांना दिलेत. पक्षातर्फे बुथपातळीपासून राबविण्यात येत असलेल्या पक्षाच्या कार्यविस्तार अभियानाचा आढावाही त्यांनी घेतला. या कार्यविस्तार अभियानांतर्गत अमित शाह हे देशाचा दौरा करीत आहेत. त्यात नागपूरचाही समावेश असल्यामुळे ते आज येथे आले होते.
गेल्या वर्षी भाजपाने देशभर सदस्य नोंदणी महाअभियान राबविले. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झाली. महाराष्ट्राला १ कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. नागपूर शहरातही ५ लाख सदस्य नोंदणी करण्यात आली. त्याचे चांगले फळ भाजपाला मिळाले. महानगरपालिकेत एकतर्फी म्हणजेच १०८ जागा जिंकून भाजपाने ऐतिहासिक विजय मिळविला. केंद्र सरकारने २७ मे रोजी तीन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला. दोन वर्षांनी म्हणजेच २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी भाजपाने आतापासून तयारी सुरू केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ४०० जागांचे लक्ष्य निर्धारित केले आहे. विद्यमान परिस्थितीत ५४३ सदस्यीय लोकसभेत भाजपाचे २८१ खासदार आहेत. ही लक्ष्यप्राप्ती कशी करता येईल, याच्या काही टिप्सही आज सोमवारच्या बैठकीत अमित शाह यांनी दिल्या. त्यांच्या रणनीतीमुळेच भाजपाला अलीकडेच पार पडलेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले होते. या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी विभागनिहाय प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सर्वपक्षीय सत्कार समारंभाला अमित शाह येणार होते. परंतु, केंद्रातील भाजपा सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिल्लीत शनिवार, रविवार या दोन्ही दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. मात्र आज सोमवारी अमित शाह यांनी नागपुरात येऊन रविभवनात भाजपाच्या निवडक पदाधिकारी आणि आमदारांशी तासभर चर्चा केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, खा. अजय संचेती, शहर महामंत्री संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके आदी पदाधिकार्यांनी शहरातील भाजपाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.
गेल्या वर्षी राबविलेल्या सदस्य नोंदणी महाअभियानादरम्यान नोंदविलेल्या सदस्यांशी १५ जूनपर्यंत संपर्क साधण्याचे निर्देश शाह यांनी शहर पदाधिकार्यांना दिले. प्रत्येक बुथवरून दररोज किमान २०० सदस्यांशी संपर्क साधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. तसेच केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना, सरकारचे उपक्रम आदींची माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी पदाधिकार्यांना दिलेत.
दरम्यान, अमित शाह यांनी सायंकाळी महालस्थित संघ कार्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची सदिच्छा भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली.

एकत्रित निवडणुकांचा फायदाच!
नगरपालिकेपासून ते लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुका एकत्र घ्यावात, याबाबत केंद्र सरकार विचार करीत आहे. या संदर्भात बैठकीत २०१९ साली हे शक्य आहे का, अशी विचारणा करण्यात आल्यानंतर, तसे शक्य नसल्यामुळे २०२४ सालच्या निवडणुकीपासून हे शक्य आहे. हे कसे शक्य आहे, असे विचारले असता राष्ट्रीय अध्यक्षांनी उपाय सुचविला की, त्याआधी ज्या निवडणुका होतील त्यांचा कार्यकाळ २०२४ पर्यंत जेवढा राहील तेवढाच असेल. उदाहरणादाखल बोलताना ते म्हणाले की, मनपाची पुढील निवडणूक (२०२२ साली) झाल्यानंतर निवडून येणार्या सदस्यांचा कालावधी दोनच वर्षांचा राहील. उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शासकीय पातळीवर एकूण १९०० रुपये खर्च झाला. एवढाच खर्च साधारणत: प्रत्येकच निवडणुकीत होत असतो. एकत्रित निवडणुका घेतल्यानंतर किती पैसे वाचतील याचा अंदाज घेता येऊ शकतो, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय विविध पक्षांचा होणारा खर्च व वाया जाणारा वेळ वाचेल, नागरिकांनाही त्रास होणार नाही या बाबीही त्यांनी लक्षात आणून दिल्या.