लष्कर ए-तोयबाच्या २० ते २५ दहशवाद्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे वृत्त गोपनीय सुत्रांनी दिले आहे. हे दशतवादी मुंबईवर झालेल्या २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. देशातील विमानतळे, रेल्वे स्थानके आणि गर्दीच्या ठिकाणांना दहशवाद्यांकडून लक्ष करण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी सावधानेचा इशारा देण्यात आला आहे.
या वृत्ताची गंभीर दखल घेत भारत आणि पाकच्या सीमेलगत असलेल्या सर्व राज्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याच्या सुचना सुरक्षा यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत. तसेच गृहमंत्रालयाने सर्व सुरक्षा दलांना तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संशयित वस्तू किंवा संशयित व्यक्ती आणि वाहनांची कसून तपासणी करण्याच्या पोलिसांना सुचना दिल्या आहेत.
मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय लष्काने दहशवाद्यांविरोधात केलेल्या कडक कारवाईमुळे दहशतवाद्यांचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे दहशवादी केव्हाही हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची चूक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, ब्रिटनच्या मँचेस्टर आणि जगभरातील इतर देशांमध्ये नुकतेच दहशवद्यांनी मोठे हल्ले घडवून आणले आहेत. याच्यापूर्वीच दहशवादी मुंबई, नवी दिल्ली, राजस्थान आणि पंजाबमध्ये हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली होती.





