👁 11 Views

स्थानिकांच्या आरोग्याचा विचार करुन कचऱ्याची विगतवारी बंद करावी – पर्यावरण मंत्री

मुंबईदि. 31 : गोराई येथील डंपिंग ग्राऊंड शेजारील कचऱ्यांच्या गाड्यांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. स्थानिकांच्या समस्या जाणून तातडीने कचरागाड्या व कचऱ्याची विगतवारी कायमस्वरुपी बंद करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.

            मंत्रालयात गोराई येथील डंपिंग ग्राऊंड संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होतेत्यावेळी श्री. कदम बोलत होते. या बैठकीस प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी.एन. अनबलगनअतिरिक्त आयुक्त संजय देशमुखकचरा व्यवस्थापनचे मुख्य अभियंता श्री.अन्सारी यांच्यासह संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
          श्री. कदम म्हणाले कीगोराई 3 येथील डंपिंग ग्राऊंड शेजारी कचऱ्यांच्या गाड्यांचे वाहनतळ असलेल्या ठिकाणी ओला व सुखा कचरा वेगवेगळा करण्यात येतो. या विगतवारीच्या प्रक्रीयेमुळे परिसरात दुर्गंधी पसरुन स्थानिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. स्थानिकांच्या आरोग्याला महत्व देऊन सदर कचरागाड्या व कचऱ्याची होणारी विगतवारी कायमस्वरुपी बंद करावी, असे निर्देश श्री. कदम यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *