👁 10 Views

सरकार संपात फूट पाडत आहे, एकत्र या : शरद पवार

मुंबई : अल्पकर्जधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे संकेत देत राज्य सरकार संपात फूट पाडत आहे. शेतकऱ्यांना संपवण्याची या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संप यशस्वी करावा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनामुळे संपकरी शेतकऱ्यांना एकप्रकारे प्रोत्साहनच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संपूर्ण कर्जमाफीची शेतकऱ्यांची भूमिका आहे. स्वामिनाथन आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे उत्पादन खर्च अधिक 50 टक्के देण्याबाबतही शेतकऱ्यांनी आग्रही राहावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. पण शेतमालाची नासाडी न करता गावातील गरीब घटकांना त्याचे वाटप करावे आणि सामान्य लोकांशी आपली नाळ भक्कम करावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी 1 जूनपासून संपाचे हत्यार उपसले आहे. संपकरी शेतकऱ्यांकडून भाजीपाला, दूध यांसारख्या वस्तू रस्त्यावर फेकून आंदोलन केले जात आहे. मात्र या वस्तू गरिबांना देऊन त्यांची गरज भागवावी, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *