👁 10 Views

घाई घाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय- जयाजी सूर्यवंशी

मुंबई | शेतकरी संप मागे घेण्याबाबत घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचा पश्चाताप होतोय, असं शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटलंय. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही कबुली दिली. 
रात्री या गोष्टी लक्षात येताच मी कोअर कमिटीशी संपर्क साधला. पुन्हा एकदा बैठक घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करता येईल का याबाबत मी त्यांच्याशी बोलणार असल्याचं जयाजी सूर्यवंशी यांनी म्हटलंय

सदाभाऊंच्या घरी नव्हे तर काय फुटपाथवर झोपायचं का?

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरी झोपायला होते. आयबीएन लोकमत वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने याबाबत जयाजी सूर्यवंशी यांना छेडले असता सदाभाऊंच्या घरी नव्हे तर काय फुटपाथवर झोपायचं का?, असा प्रतिप्रश्न जयाजी सूर्यवंशी यांनी विचारला. 
शेतकरी संपात काही असामाजिक तत्वं घुसली असून त्यांच्याकडून दंगली घडवण्याचं काम सुरु आहे, असा आरोप जयाजी सूर्यवंशी यांनी केला. आम्ही धुतल्या तांदळासारखे आहोत असा दावाही त्यांनी केला

जयाजीराव सूर्यवंशी बरं हाय का? शेतकऱ्यांनी ऐकलं ते खरं हाय का?

शेतकरी संप मिटवण्यात अन्नदाता शेतकरी संघटनेच्या जयाजीराव सूर्यवंशी यांची भूमिका महत्वाची मानली जातेय. मात्र जयाजीराव आणि त्यांच्या टीमविरुद्ध राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष पहायला मिळतोय.
आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीने घेतलेला एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यामध्ये मुख्यमंत्री जयाजीरावांना बाजूला घेऊन कानगोष्टी करताना दिसत आहेत. त्यामुळे जयाजीरावांना मुख्यमंत्र्यांनी काय कानमंत्र दिला, ज्यामुळे त्यांनी हा संप मागे घेतला, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जयाजीराव यांची जवळीकही अधोरेखित केली जात आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये विश्वासघात झाल्याची भावना आहे. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *