नांदेड – वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली असताना शेतात काम करणाऱ्या चार शेतकऱ्यांवर विज पडल्याने दोन सख्खे भाऊ जागीच गतप्राण झालेतर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना नायगाव तालुक्यातील इकळीमाळ येथे जुन रोजी वाजताच्या दरम्यान घडली. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
नायगाव तालुक्यातील कुंटूर व इकळीमाळ दरम्यान नागोराव बकवाड यांचे शेत असून त्यांच्या शेतातील भुईमूगाच्या पिकाची नुकतीच काढणी झाली असून. पावसाळ्याचे दिवस तोंडावर आल्याने शेतात अस्तव्यस्त असलेले भुईमूगाचे काड एकत्र करुन त्याचा ढिग करण्यासाठी बकवाड यांनी शेजारी असलेले गंगाधर गोविंदराव मृदंगे ( वय 20 ), शिवाजी गोविंदराव मृदंगे (वय 25 वर्षे ) तानाजी रघूनाथ पुयड यांना 3 जून रोजी बोलावून घेतले व चौघे मिळून काड एकत्र करत असताना अचानक चौघावर वीज पडली. यात गंगाधर मृदंगे, शिवाजी मृदंगे हे दोघे सख्खे भाऊ जागीच गतप्राण झाले तर तानाजी पुयड व नागोराव बकवाड हे गंभीर जखमी झाले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





