मद्य विक्रेत्यांनी दारू ढोसून झिंगाट होवून केला आनंदोत्सव साजरा
सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त
* इंदापूर शहरातून गेलेला जुना पुणे सोलापूर महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित
* शहरातील रस्ता झाला अवर्गीकृत
* दारू बंदीच्या निर्णयानंतरची राज्यातील पहिलीच घटना
इंदापूरात 1 जुन पासून दारू दुकाने दारू पिण्यासाठी खुली झाली
इंदापूर- मनसोक्त दारू प्यायची आहे , मगजी कशाला करायची! बिनधास्त दारू पिण्यासाठी इंदापूर ला या, अशी आरोळी ठोकली आहे मद्य विक्रेत्यांनी. पुणे व सोलापूर या महामार्गावरील अडीचशे किलोमीच्या मध्यावर असणाऱ्या इंदापूरात आता दारू पिर्णार्यांसाठी मिळणार खुले आम दारू मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देशभरात राज्य महामार्गावर पाचशे मिटर अंतरावर 1 एप्रिल पासून दारू विकण्यास बंदी घातली आहे.
त्यामुळे राज्य व राष्ट्रीय माहामार्गावरिल मद्यविक्री बंद करण्यात आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शहरातून गेलेले जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करावा यासाठी हालचाली चालु झाल्या होत्या. या हालचालीला यश आले असुन शहरातून गेलेला मार्ग अवर्गीकृत करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री मालोजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर शहरात मद्यपिंची रेलचेल होणार आहे. पुणे ते सोलापूर या महामार्गावर जवळपास अडीचशे किलोमीटर अंतराच्या मध्यावर असणाऱ्या इंदापूर येथे खुप दुरवरून मद्य ढोसण्यासाठी तळीरामांचा मोठ्या प्रमाणावर वावर होणार आहे. मात्र दारू विक्रेते यांना अत्यानंद झाला असले तरी सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दारू विक्रेते यांनी हा निर्णय होताच भरपूर दारू पिऊन झिंगाट होवून आनंदोत्सव साजरा केला आहे.काही नगरसेवकांनी इंदापूर मध्ये दारू विक्री चालू व्हावी,यासाठी प्रयत्न केले आहेत अशी चर्चा आहे. तर काही नगरसेवकांना रस्ता महामार्गावर न राहता शहरात वर्ग होण्यासाठी दारू विक्रेत्यांनी मदत केली असल्याचे बोलले जाते. या कामी दोन नगरसेवकांनी जबाबदारी घेतली असल्याचे वृत्त आहे. आता मात्र इंदापूर शहरात महामार्गावर दारू विक्री खुले आम चालू झाली आहे.
शहरातून गेलेले जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग
क्रमांक 9 नवीन 65 या रस्याची इंदापूर शहरातून जाणारी लांबी कि. मी. 132/200 ते 137/ 200 अशी होती. इंदापूर शहराच्या पश्चिम बाजूकडून राष्ट्रीय महामार्ग आठ कि.मी लांबीचा बाह्यवळण मार्ग अस्तित्वात आल्याने व त्यावरून अखंडीत वाहतूक सुरू झाल्याने शासन निर्णय क्रमांक रवियो 2013 / प्र. क्रमांक 5/नियोजन- 2 दिनांक 6 मे 2014 नुसार पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 ची इंदापूर शहरातून जाणारी लांबी दर्जावनत करून राज्यमार्ग क्रमांक 125 अ अशी करण्यात आलेली आहे. सदरचा राज्य मार्ग क्रमांक 125 अ हा रस्ता अवर्गीकृत करण्याचा प्रस्ताव संदर्भ क्रमांक 2 अन्वये शासनास प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने राज्यमार्ग क्रमांक 125 अ हा रस्ता अवर्गीकृत करण्याचे शासनाच्या विचारधीन होते.
मुख्य अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग पुणे यांचा प्रस्ताव व संदर्भ शासन निर्णय क्रमांक -आरबीडी-1081/ 871/ रस्ते-7, रद.09/03/2001 मधील रिप 5 मधील तरतूद
विचारात घेऊन, पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषद हद्दीतील राज्यमागव क्र. 125 अ हा 5.00
रक.मी. (साखळी क्र. 132/200 ते 137/200) लांबीचा रस्ता अवगीकृत करण्यात येत आहेत.
राज्यमागवक्र. 125 अ ची 5.00 रक.मी. लांबी (साखळी क्र. 132/200 ते 137/200)
अवगीकृ त करण्यात येत आहे. सदर रस्त्याचा देखभाल- दुरूस्तीचा खर्च नगरपररषदेकडून
करण्यात येईल व अवगीकृ त के लेल्या रस्त्यावर होणाच्या देखभाल-द रूस्ती कररता
शासना मार्फत कोणतेही अतिरिक्त अनुदान देण्यात येणार नाही. या अटीच्या अधीन राहून सदर
इंदापूर नगरपरिषद हद्दीतून जाणार्या राज्यमागवक्र.125 अ ची 5.00 रक.मी. लांबी (साखळी क्र.
132/200 ते 137/200) ही अवगीकृ त करण्यास शासन द्वारे मान्यता देत आहे. असा आदेश महाराष्ट्र राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने काढण्यात आला आहे.
इंदापूर नगरपालिकेला अंतर्गत रोडवरील स्ट्रीट लाईट (पथदिवे) चे लाईटबील खर्च पेलवत नाही. नगरपालिकेकडे कोट्यावधीची थकबाकी आहे. शहरातील अनेक समस्या निधीच्या कमतरतेमुळे नगरपालिकेला सोडविता येत नाहीत, अशा परिस्थितीत नगरपालिकेने पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या देखभालीसाठी शासनाकडून मिळाणार्या निधीवर पाणी सोडून अवर्गीकृत रस्ता करण्यास संमती दिली आहे त्यामूळे शहरावासीयातून संतापाची लाट उसळली असून या निर्णयाविरोधात मोठे जनअंदोलन होणार असल्याचे बोलले जात आहे .
इंदापूरात दारू बंद झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत झाले .दारू पिर्णार्यांच्या घरात सुख लागून चार पैसे शिल्लक राहत होते. आता मात्र दारू मिळणार असल्याने त्यासर्व घरातील दारू पिर्णार्यां दारूड्यांची पावले आपोआप बारकडे वळू लागली आहेत. .मात्र ज्या नागरिकांच्या मतांच्या जीवावर नगरसेवक म्हणून निवडून आलेल्यांनी आपल्या घरातील नातेवाईकांची दारू दुकाने चालू करण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले. आता समाजकारण,राजकारण वेळी मालोजीराजे यांच्या नावाचा वापर करण्याची भाषा करणारे नेते काय बोलणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मावळ्यांची भुमिका काय असणार हा खरा सवाल उपस्थित होत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





