मघाशी शेतात गेलो होतो. तिथं तात्या भेटले.
“काय तात्या बरं आहे का?” मी विचारलं.
“हो, बरं आहे की !”
“माळवं चालू आहे वाटतं !” त्यांच्या बुट्टीत काकड्या बघून मी म्हटलं.
“आहे की !…..पण संप चालू आहे , त्यामुळं बाजारात जात नाही.”
“काय काय आहे?”
“पालक आणि काकडी एवढंच आहे सध्या…..उन्हाळ्यात पाणी पुरायला पाहिजे की!”
“चार दिवसांत संप मिटला नाही तर भाज्या निब्बर होऊन जातील नाही?”
” होऊ देत झाल्या तर!”
“पण भाज्या नाही तोडल्या तर नुकसान होणार की “
“होऊ दे झालं तर!…..संप मिटेपर्यंत भाज्या म्हशीला खायला घालायच्या…..ह्या काकड्या म्हशीसाठीच तर तोडल्यात… काकडी खाऊन खाऊन म्हस दूधही एकदम गोड द्यायला लागल्या.” तात्या हसत हसत बोलले.
“पण अशानं नुकसान तर होणारच की!”
“आतापर्यंतच्या आयुष्यात कवडीमोलानं भाज्या विकल्या तवा नुकसान झालंच की !…..नुकसान काय आमच्या पाचवीलाच पुजलंय !…. आता आणखी चारआठ दिवस सोसायचं नुकसान. …..आतापर्यंत माळवं लोकांस्नी फुकट खायला घातलं आता जनावरांस्नी थोडं घालू द्या की !” तात्या हसत हसत बोलले.
…….संप लवकर मिटणार नाही बहुतेक !…..सामान्य शेतकऱ्यालाही आता आपल्या हक्काची जाणीव झालेली दिसतेय !