* दुर्घटनाग्रस्त कुटूंबाला मुख्यमंत्री निधीतून अर्थिक मदत देण्याची मागणी *
* चार बालकांच्या मृत्यु प्रकरणी महसूल मधील जबाबदार कर्मचार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी *
* विविध सामाजिक संघटना व पक्षसंघटनांचा मोर्चात उत्सफुर्त सहभाग *
चंद्रभागा नदीत गवळी समाजातील चार निष्पाप बालके नुकतीच मरण पावली या घटनेस चंद्रभागेतून होत असलेला अवैध वाळू उपसा कारणीभूत असून चार बालकांचा मृत्यु हा चंद्रभागा नदीत होत असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयामुळे झालेला आहे.त्या मुळे या अवैध वाळू उपशाबाबत जबाबदार धरुन तहसिलदार,मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावेत.चंद्रभागा नदीतून होणारा अवैध वाळू उपसा बंद करण्यात यावा.चंद्रभागानदीतून होणार्या वाळू उपशाची जबाबदारी निश्चिीत करुन यापुढे वाळू उपशा मुळे पडलेल्या खड्डयामुळे कोणाचा बळी गेला तर त्याची जबाबदारी निश्चित करणारा कायदा करण्यात यावा.उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी.दुर्घटना ग्रस्त कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपयांची अर्थिक मदत मुख्यमंत्री निधीतून तात्काळ जाहीर करण्यात यावी.चंद्रभागेच्या वाळवंटात कायमस्वरुपी लाईफ गार्ड कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात यावी.तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या भाविकांचा विमा उतरण्यात यावा आदी मागण्यांसाठी आज पंढरपूर शहर व तालुका गवळी समाजाच्या वतीने येथील प्रांत कार्यालयावर विराट निषेध मोर्चा काढण्यात आला.प्रांताधिकार्यांच्या अनुपस्थितीत तहसिलदार मधूसुदन बर्गे यांना दुर्घटनाग्रस्त कूटूंबियांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शनिवारी घडलेल्या या घटनेनंतर पंढरपूर शहरातून अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.चंदभागेच्या पात्रातूण बेसुमार वाळू होत असल्याने मोठ मोठे खड्डे पडले आहेत.या खड्डयात अनेक भाविकांचे यापुर्वीही बळी गेेले आहेत.मात्र महसूूल प्रशासनातील अधिकारी याबाबत जबाबदारी झटकत आले आहेत.शनिवारच्या घटनेनंतर आता प्रशासन जागे झाले असून या ठिकाणचा वाळू उपसा रोखण्यासाठी पथक नेमले आहे.मात्र प्रत्येकवेळी दुर्घटना घडल्यास अशा प्रकारचे नाटक केले जाते.व पुन्हा अवैध वाळू उपसा सुरु होतो. याबाबत कायमस्वरुपी प्रतिबंधात्मक उपायोजना करावी अशी प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहे.आजच्या या मोर्चात सहभागी झालेले युवक महसूल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत असल्याने वातावरण काही काळ तणावपुर्ण झाले होते.
या मोर्चात गवळी समाजातील महिला व युवक मोठया संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चास वारकरी संाप्रदाय पाईक संघ,अखिल भारतीय छावा संघटना,कोळी महासंघ,सभंाजी ब्रिग्रेड पंढरपूर शहर,युवा भिमसेना,अखिल भारतीय युवक मराठा महासंघ,महादेव कोळी समाज संघ,यशवंत सेना,बारा बलुतेदार महासंघ,विश्व हिंदू परिषद,पंढरपूर शहर शिवसेना,हिंदू महासभा,लिंगायत प्रतिष्ठान,महर्षी वाल्मिकी संघ,पंढरपूर शहर कॉग्रेस कमेटी व युवक कॉग्रेस,राष्ट्रवादी कॉग्रेस,विक्रम शिरसट मित्र मंडळ,अखिल महाराष्ट्र रामोशी समाज कृती समिती,अदिम विकास परिषद आदींसह अनेक आजी-माजी नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी निवेदनाद्वारे गवळी समाजाच्या या मोर्चास आपला पाठींबा व्यक्त केला.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





